Tuesday, October 14, 2025
Homeमारेगावदलित-बहुजनांचा "वंचित" एकच पर्याय .

दलित-बहुजनांचा “वंचित” एकच पर्याय .

•कार्यकर्ता मेळाव्यातून राजू निमसटकर यांची जाहीर गर्जना.

Ajay Kandewar,वणी :- मारेगाव तालुक्यातील सर्वहारा, शोषित, आदिवासी, वंचित आणि बहुजन समाजाने आता राजकारणात आपली ताकद दाखवण्याचा निर्धार केला आहे. याच निर्धारातून १० सप्टेंबर रोजी मारेगाव येथील बदकी भवन सभागृहात वंचित बहुजन आघाडीचा कार्यकर्ता मेळावा उत्साहात पार पडला.

या मेळाव्यात राजू निमसटकर यांनी स्पष्ट शब्दांत ठणकावले की,“जुलमी मनुवादी व्यवस्थेविरुद्ध लढाई हवी असेल, तर बाळासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखालील वंचित बहुजन आघाडीशिवाय दुसरा कोणताही पर्याय नाही. दलित-बहुजनांचा एकच पर्याय आहे आणि तो म्हणजे वंचित बहुजन आघाडी.”

या मेळाव्यातील गर्दी पाहून पारंपरिक राजकीय पक्षांना आता धडकी भरली आहे. वर्षानुवर्षे “विकासाचे गाजर” दाखवणाऱ्या आणि निवडणुकीनंतर जनतेला विसरणाऱ्या सत्ताधाऱ्यांना दलित-बहुजन समाजाने थेट इशारा दिला आहे.भ्रष्टाचार, बेरोजगारी आणि शेतकरी समस्यांवर बोलताना ‘मोठमोठी आश्वासने’ देणारे हे पक्ष आता वंचित आघाडीच्या जनआंदोलनामुळे उघडे पडतील, अशी चर्चा कार्यकर्त्यांत रंगली.या मेळाव्यानंतर राजकारणात नवा वारा सुटला आहे.लोकांच्या खिशावर आणि पोटावर गदा येत असताना “विकासाच्या खोट्या कहाण्या” सांगणाऱ्या पक्षांच्या नेत्यांना आता गावोगाव प्रश्न विचारला जाणार आहे. दलित-बहुजनांचा आवाज संघटित झाला, तर सत्ताधाऱ्यांचे सिंहासन हादरेल, असा स्पष्ट संदेश या मेळाव्याने दिला आहे.भारतीय बौद्ध महासभा, समता सैनिक दलाचे पदाधिकारी, तसेच अमरनाथ तेलतुंबडे, तात्याजी चिकाटे, अजबराव गजभिये, यशवंतराव भरणे, गौतम ताकसांडे यांसारख्या जुन्या कार्यकर्त्यांची उपस्थिती या मेळाव्याला आणखी बळकटी देऊन गेली. ग्रामीण भागातून आलेल्या शेकडो कार्यकर्त्यांचा लोंढा आणि महिला कार्यकर्त्यांची भक्कम हजेरी यामुळे हा मेळावा सामाजिक-राजकीय शक्तीप्रदर्शनात परिवर्तित झाला.

नवनियुक्त कार्यकारिणी :- मारेगाव ग्रामीण (पुरुष) –अध्यक्ष: ज्ञानेश्वर मून, कार्याध्यक्ष: गौतम दारुंडे, महासचिव: संजय जीवने🔹मारेगाव ग्रामीण (महिला) – अध्यक्ष: अभिषा निमसटकर, कार्याध्यक्ष: शोभा चंदनखेडे🔹 मारेगाव शहर (महिला) –अध्यक्ष: रेखा काटकर, कार्याध्यक्ष: शोभा दारुंडे🔹मारेगाव शहर (पुरुष) – अध्यक्ष: अनंता खाडे, कार्याध्यक्ष: रवी तेलंग, महासचिव: विनेश मेश्राम

 

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular

Most Popular

Recent Comments