Tuesday, October 14, 2025
HomeBreaking Newsढाण्या वाघ मैदानात उतरला,विक्रांत चचडा लोकसभा युवासेना अध्यक्षपदी.....

ढाण्या वाघ मैदानात उतरला,विक्रांत चचडा लोकसभा युवासेना अध्यक्षपदी…..

•वणीच्या राजकारणात हलचल. •शिंदे सेनेला नवं बळ.

Ajay kandewar,Wani:- शिवसेनेचा भगवा पुन्हा एकदा जोमात फडकतोय आणि वणी–आर्णी–वरोरा परिसरात नव्या उर्जेची चाहूल लागली आहे. वं. हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारसरणीवर चालणाऱ्या शिंदे सेनेला नवसंजीवनी देणारी घोषणा शुक्रवारी करण्यात आली.ढाण्या वाघ विक्रांत चचडा यांची वरोरा–वणी–आर्णी लोकसभा युवासेना अध्यक्षपदी नियुक्ती झाली आहे.

ही नियुक्ती उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार आणि खासदार डॉ.श्रीकांत शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली झाली असून या घोषणेने वणी,आर्णी आणि वरोरा तालुक्यांत युवासैनिकांचा जोश आकाशाला भिडला आहे.सामाजिक भान,प्रभावी जनसंपर्क आणि संघटनकौशल्यासाठी ओळखले जाणारे विक्रांत चचडा हे नाव आज वणी तालुक्यात राजकीय चर्चेचं केंद्र बनलं आहे.त्यांच्या उदयानं केवळ युवासेनेलाच नाही,तर शिंदे सेनेच्या संपूर्ण संघटनाला नवं रक्त आणि नवी दिशा मिळाली आहे.ही जबाबदारी पालकमंत्री संजय भाऊ राठोड, पराग पिंगळे (पश्चिम विदर्भ समन्वयक), हरिहर लिंगांवर (संपर्क प्रमुख, यवतमाळ), राजुदास जाधव (जिल्हाप्रमुख) आणि विश्वास नांदेकर (लोकसभा समन्वयक) यांच्या नेतृत्वाखाली विश्वासाने देण्यात आली.या नियुक्तीला युवासेना कार्याध्यक्ष पुरवेश सरनाईक, मुख्य सचिव राहुल लोंढे, सचिव किरण साळी, पूर्व विदर्भ सचिव शुभम नवले आणि निरीक्षक हर्षल शिंदे यांचे मार्गदर्शन लाभले.

•कोट….

बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारसरणीवर चालत संघटनेला बळकट करणे, हीच माझी प्राथमिकता असेल.

राजकीय वर्तुळात सध्या एकच चर्चा ….

वणी नगरपरिषदेच्या निवडणुकीत विक्रांत चचडा ‘किंगमेकर’ ठरणार असल्याचं म्हटल्या जात आहे.त्यांच्या नेतृत्वाखाली युवा पिढी एकवटत असून,शिंदे सेनेचा विक्रांत फॅक्टर येत्या निवडणुकीत निर्णायक ठरू शकतो, असा ठाम विश्वास व्यक्त होत आहे.वणी शहरात ढाण्या वाघ मैदानात उतरला अशी घोषणा आणि जयघोष सुरू आहेत.त्यांच्या संघटनशक्ती, संपर्कक्षमता आणि युवकांशी असलेल्या थेट नात्यामुळे विक्रांत चचडा हे नाव फक्त युवासेनेपुरतं मर्यादित न राहता,वणीच्या राजकीय गणितातील प्रमुख घटक बनत चाललं आहे.शिंदे सेनेच्या नव्या युगाची सुरुवात वणीपासून होत असल्याचं दृश्य आता स्पष्ट दिसतंय.ज्याठिकाणी एकेकाळी संघटना मंदावली होती, तिथे आज पुन्हा जयजयकार घुमतोय कारण मैदानात उतरला आहे “एक ढाण्या वाघ… विक्रांत चचडा…….”

 

 

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular

Most Popular

Recent Comments