Ajay Kandewar,Wani:- न्यायालयाने पतसंस्थेवर स्पेशल ऑडीट करण्याचे आदेश दिले हे अगदीं चुकीची माहिती आहे असा जर कोणताही आदेश असेल तर ते पुरावा सिद्ध करावा.खोट्या माहीत्या जनसामान्य पर्यंत पोहोचवून श्री.रंगनाथ स्वामी पतसंस्थेवर बिनबुडाचे आरोप केले .असा दावा संस्थेचे अध्यक्ष देवदास काळे यांनी केला .
कोर्टात दोन्हीकडून समजून कोणताही असा आदेश आ पिलेला नाही. कोर्टाच्या एका आदेशात फक्त अहवालाची स्टेटस ची माहिती द्या असाच आदेश दिला. हे बिनबुडाचे खोट्या माहित्या जनसामान्यांपर्यंत पोहोचवून ते सर्व संभ्रम पसरविण्याचा प्रकार त्या अपहार केलेल्यांकडून सूरू आहे.त्या एका आदेशात एका वर्षापूर्वी जे टेस्ट ऑडिट करण्यासाठी सांगितलं होतं त्याच आज रोजी स्टेटस काय आहे एव्हढंच “त्या एका आदेशात” आहे परंतु कोर्टाने स्पेशल ऑडिट करा असे कोणताच आदेश नाही.विशेषतः असं काहीही वापरून श्री रंगनाथ स्वामी पतसंस्थेचा नाव बदनाम करण्याचे डाव आखण्यात तक्रारदार व्यस्त आहे.सध्या तक्रारदारांची परिस्थिती “चोराच्या उलट्या बोंबा” अशीच म्हणणे चुकीचं ठरणार नाही.
“यापुर्वी अमोल नावडे व इतर यांनी केलेल्या तक्रारीचे अनुषंगाने मा. सहकार आयुक्त यांचे आदेशाने चाचणी लेखापरीक्षण सुरू आहे. त्याचा अहवाल संबंधित लेखापरिक्षकाने अजुन पर्यत विभागास सादर केलेला नाही. त्यांनी चाचणी लेखापरीक्षण पुर्ण करून अहवाल लवकर सादर करावा अशी संस्थेची मागणी आहे.”