Tuesday, October 14, 2025
HomeBreaking Newsउपसरपंच सचिन रासेकर बनला "निराधारांचा आधार"...

उपसरपंच सचिन रासेकर बनला “निराधारांचा आधार”…

•सेवाभावाने वाढदिवस साजरा. •नव्या आदर्शाचा मिळाला संदेश.

Ajay Kandewar,Wani : तालुक्यातील मोहदा ग्रा.पं.येथील लोकप्रिय व कार्यक्षम उपसरपंच सचिन रासेकर यांनी यंदा आपला वाढदिवस वेगळ्या व प्रेरणादायी पद्धतीने साजरा केला. खर्चिक पार्ट्या, गाजावाजा, फटाके वा दिखावा न करता — त्यांनी हा दिवस सेवाभावाच्या कार्यात व्यतीत करत गावात एक नवा आदर्श निर्माण केला आहे.

या विशेष दिवशी सकाळी त्यांनी गावातील निराधार व गरजू व्यक्तींच्या नोंदणी आणि फॉर्म भरण्याचे काम स्वतःच्या हाताने केले. अनेक निराधार नागरिकांना शासनाच्या योजनांचा लाभ मिळावा, ही त्यांची प्राथमिक भावना होती. “वाढदिवस आनंदाचा असतो, पण जर त्या आनंदातून कोणाचं जीवन सुधारलं तर त्याहून मोठं समाधान नाही,” असे विचार रासेकर यांनी व्यक्त केले.गावकऱ्यांनी सचिन रासेकर यांच्या या साधेपणाचं आणि जनसेवेच्या वृत्तीचं मनापासून कौतुक केले आहे. “आजच्या काळात अनेक नेते वाढदिवशी मोठे कार्यक्रम करतात, पण उपसरपंच रासेकर मात्र खऱ्या अर्थाने लोकसेवेच्या माध्यमातून आपला दिवस साजरा करतात, हे त्यांचं वैशिष्ट्य आहे,” असे मत ग्रामस्थांनी व्यक्त केले.गावकऱ्यांच्या अपेक्षा स्पष्ट आहेत — सचिन रासेकर यांनी हा सेवाभाव कायम ठेवावा आणि गावातील विकास, शेतकऱ्यांच्या समस्या, तरुणांसाठी रोजगार या विषयांवर ते यापुढेही असाच सक्रिय सहभाग घ्यावा. लोकांमध्ये त्यांच्याबद्दलचा विश्वास आणि आपुलकी वाढत चालली आहे, आणि त्यांच्या नेतृत्वातून गावात सकारात्मक बदल घडत असल्याचं अनेकांचे म्हणणे आहे.

वाढदिवस म्हणजे आनंदाचा क्षण, पण तो जर समाजहितासाठी वापरला गेला तर तो दिवस खऱ्या अर्थाने “अविस्मरणीय” ठरतो. उपसरपंच सचिन रासेकर यांनी यंदा साजरा केलेला वाढदिवस हा आगळावेगळा प्रेरणादायी ठरला असून, गावकऱ्यांच्या मनात त्याबद्दलचा आदर आणखी वाढला आहे.

 

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular

Most Popular

Recent Comments