Monday, December 22, 2025
Homeराजूर collieryइन्कलाब जिंदाबादच्या घोषणांनी दुमदुमला भगतसिंग चौक.....

इन्कलाब जिंदाबादच्या घोषणांनी दुमदुमला भगतसिंग चौक…..

Ajay kandewar,Wani :- “इन्कलाब जिंदाबाद”च्या जोशपूर्ण घोषणांनी राजूर येथील भगतसिंग चौक रविवार, दि. २८ सप्टेंबर रोजी सकाळी निनादला. शहीद-ए-आझम भगतसिंह यांच्या जयंतीनिमित्त माकपच्या वतीने आयोजित अभिवादन कार्यक्रमात गावकऱ्यांनी व कार्यकर्त्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.

कार्यक्रमाची सुरुवात येथील विशाल लभाने व अजय भुसारी यांच्या हस्ते भगतसिंग यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून झाली. त्यानंतर गावातील नागरिक, तरुण व कार्यकर्त्यांनी पुष्प अर्पण करून शहीदांना अभिवादन केले.

यानंतर माकपचे कॉ.ॲड. कुमार मोहरमपुरी,जयंत कोयरे, विजय तोतडे व वैभव मजगवळी यांनी शहीद भगतसिंह यांच्या क्रांतिकारी विचारांचा आढावा घेत, त्यांच्या बलिदानाचे महत्व उपस्थितांसमोर मांडले.दरम्यान, कार्यकर्त्यांनी उत्साहपूर्ण घोषणाबाजी करत “इन्कलाब जिंदाबाद ! शहीद-ए-आझम भगतसिंग अमर रहे !”अशा घोषणांनी संपूर्ण परिसर दुमदुमून गेला.या अभिवादन कार्यक्रमामुळे चौकात देशभक्तीचे वातावरण निर्माण झाले होते.यावेळी अमित करमरकर, सुनील सातपुते व इरफान शेख उपस्थित होते.

 

 

 

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular

Most Popular

Recent Comments