•गावातील अनेक प्रश्न मार्गी लावणार – राजू उंबरकर
( मनसे ,राज्य उपाध्यक्ष)
•वणी उपविभागात युवकांचा कल मनसेचा अजेंडाकडे
अजय कंडेवार,वणी:- तालुक्यातील राजूर येथील युवकांनी मोठ्या संख्येने मनसे पक्षात प्रवेश केला. राज ठाकरे यांच्या विचाराने प्रेरित होऊन मनसे राज्य उपाध्यक्ष राजु उंबरकर त्यांच्या कार्यप्रणालीवर विश्वास ठेवून राजूर येथील युवकांनी मोठ्या संख्येने मनसे पक्षात प्रवेश केला आहे. प्रसंगी मनसे राज्य उपाध्यक्ष राजू उंबरकर व फाल्गुन गोहोकर वणी तालुका अध्यक्ष यांच्य शुभ हस्ते हा छोटेखानी कार्यक्रम झाला.

प्रसंगी बोलताना मनसे राज्य उपाध्यक्ष राजु उंबरकर यांनी पक्षाची ध्येयधोरणे, पक्षाची कामाची पद्धती, राजसाहेबांच्या स्वप्नातील महाराष्ट्र, याबाबत मार्गदर्शन केले. पक्षातील कामाचे अनुभव सतरा वर्षातील जनसामान्यांसाठी चा लढा असे बरेच विषय सांगितले गेले. जनसामान्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न करायचा आहे, जनसंपर्क वाढवायचा आहे. गाव येथे शाखा वाढवायची आहे तरच पक्ष वाढ शक्य आहे तसेच स्पष्ट व परखड शब्दात स्थानीक आजी माजी नेत्यांना देखील धाऱ्यावर धरले.आधीचा राजूर गाव गेला कुठे आणि आज राजूरवर एव्हढी मोठी समस्या असूनही गावातील नेते मंडळी गेले कुठे? असा स्पष्ट सवाल करीत हा गाव काहीं माझासाठी नवा नाहीं असे उंबरकर म्हणाले. तसेचयेथील अरबाज खान या युवकाचा नेतृत्वात अनेक युवकांनी मनसे पक्षामध्ये प्रवेश केला आहे. गोरगरीबांचे प्रश्न सोडवणारी संघटना या दृष्टीने त्यांनी मनसे पक्षाला पसंती दिली. गोरगरीब सामान्य लोकांचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी कार्यरत राहणार असल्याचेही राजू भाऊ म्हणाले. राजूर गावातील मनसेचे दरोमदार राजूर अध्यक्ष अरबाज खान, थॉमस कोमलवार, अराफत खान, मनोज दासारी यांनी थेट प्रवेश घेत मनसेचे कार्य करण्यास सज्ज झाले आहे.


या कार्यक्रमात राजू उंबरकर,(मनसे राज्य उपाध्यक्ष), फाल्गुन गोहोकर, शिवराज पेचे, नबी शेख इतर पदाधिकारी,कार्यकर्ते व गावातील अनेकांची उपस्थिती होते.


