Thursday, March 5, 2026
HomeBreaking News“ॲड.निलेश"च नेतृत्व भाजपासाठी वरदान,उभारली भक्कम मोठी फळी....

“ॲड.निलेश”च नेतृत्व भाजपासाठी वरदान,उभारली भक्कम मोठी फळी….

 •शहरात “भाजप = निलेश चौधरी”,विरोधकांसाठी डोकेदुखी.

Ajay Kandewar,Wani:- वणी शहरातील राजकीय घडामोडींना वेग आला असून स्थानिक निवडणुकांचे बिगुल वाजण्याआधीच भाजपाने भक्कम तयारी केली आहे. या तयारीच्या केंद्रस्थानी असलेले शहराध्यक्ष निलेश चौधरी आज वणीकरांच्या हृदयात ठाम स्थान निर्माण करण्यात यशस्वी झाले आहेत. त्यांच्या नेतृत्वगुणांमुळे भाजपासाठी वणी शहरात नवी ऊर्जा निर्माण झाली असून विरोधकांसाठी ही परिस्थिती खऱ्या अर्थाने डोकेदुखी ठरत आहे.

निलेश चौधरी यांचे नेतृत्व अभ्यासपूर्ण, तर्कशुद्ध व लोकाभिमुख असल्याने स्थानिक पातळीवर त्यांची लोकप्रियता सातत्याने वाढताना दिसते. त्यांच्या संपर्कक्षमता व संघटनशैलीमुळे भाजपाला शहरात नवा जोम मिळत असल्याचे मत व्यक्त केले जात आहे. परिणामी, सामान्य शहर नागरिकांचा कल भाजपाकडे वळत असून पक्षाचा जनाधार विस्तारत आहे.येत्या स्थानिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपाची तयारी ठोस व नियोजनबद्ध असल्याचे संकेत मिळत आहेत. विशेष म्हणजे, वणी विधानसभेत मिळालेल्या मतांचा परफॉर्मन्स पाहता भाजपाला शहरातील लढाईत अधिक बळकटी मिळू शकते. याच कारणास्तव निलेश चौधरींच्या नेतृत्वात भाजपाने वणी शहरात ‘समोर राहून खेळ’ करण्याची रणनीती आखली आहे.

संपूर्ण वणी शहरात निलेश चौधरी हे “विश्वासार्ह नेतृत्व” म्हणून उदयास येत असून त्यांच्याकडे वाढता लोकांचा ओघ भाजपासाठी निश्चितच फायदेशीर ठरणार आहे. त्यामुळे, आगामी निवडणुकांमध्ये भाजपाच्या विजयाची तुतारी वाजवण्याचे राजकीय वातावरण शहरात जोर धरताना दिसत आहे.त्यामुळेच येत्या स्थानिक निवडणुकीत अधिकाधिक जागेवर भाजपाची झेप थेट विजयशिखराकडे असल्याचं राजकीय तज्ज्ञांचं भाकीत आहे.

 

 

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular

Most Popular

Recent Comments

You cannot copy content of this page