अजय कंडेवार,वणी:- तालुक्यात मोठ्या प्रमाणात वन संपदा असून उन्हाळ्याच्या काळात ग्रामीण भागातील जंगला-लगत गावात तेंदुपत्ता संकलनाचे काम मोठ्या प्रमाणात करण्यात येते. यामध्ये पहाटे पाच वाजता उठून स्त्री पुरुष जंगलातील टेंबूर्नी झाडावर चढून जोखमीने पाने गोळा करतात दुपारी घरी येउन कुटुंबातिल लहानापासून ते मोठ्यापर्यंत पाने एका रांगेत लाऊन शंभर पानाचा एक पुडा बांधतात अणि शंभर पुड्याचा एक शेकड़ा सरकारी दर २५० रु प्रती शेकड़ा गावातील तेंदू फड़ीवर जमा करतात. त्या नंतर शासनाने विक्री केलेल्या तेंदू पानावर जो नफा मीळतो त्यातील काही भाग मजुरांना बोनस प्रोत्साहन पर मजूरी सन्मानाने दिली जाते.हंगाम २०२२ मधील तेंदू बोनस मजुरांना देण्यात यावा याकरिता वारंवार वनविभागाच्या अधिकाऱ्यासोबत चर्चा करुन प्रोत्साहनपर मजूरी तात्काळ देण्यात यावी ही मागणी लाउन धरली. वणी प्रादेशिक कार्यालयाअंतर्गत तेंदू घटक सुकनेगाव ०२ कुर्ली ०३, वणी ०४, हे घटक हंगाम २०२२ विक्री झाले असून त्यामध्ये गोडगाव, इजासन, कुंभारखनी, उमरी, पुरड (ने), सैदाबाद, रासा, आमलोन, चीलई गाड़ेघाट, पारडी, कोरंबी, मारेगाव, विरकुंड, अश्या तिन तेंदू घटका मधील चौदा गावातील तेंदूपत्ता फड़ीवर तेंदू संकलन करणाऱ्या ५८१ कामगारांना १३ लाख २३ हजार रूपये बोनस त्यांनी जमा केलेल्या तेंदू पुड्याप्रमाने मिळनार आहे. मजुरांनी दिलेल्या बैंक खात्यावर वनविभाग वणी (तेंदू) च्या वतीने बैंक खात्यात चेक जमा करुन लवकरच मजुरांच्या खात्यात हंगाम २०२२ चे प्रोत्साहनपर मजूरी बोनस जमा होणार आहे.
तेंदुपत्ता आंदोलक विजय पिदुरकर यांनी वनविभागाच्या वरिष्ठांशी D.F.O मोबाईल वर चर्चा करुन तेंदूपत्ता मजुराला हक्काचा बोनस मजूरी घेण्यासाठी संकलन हंगामा नंतर वर्षभर वाट पहावी लागते ही बाब अतिशय चुकीची व मजूरावर अन्याय करणारी आहे. हंगाम में २०२३ संकलित तेंदूपत्ता हंगामाचा बोनस दिवाळी २०२३ मध्ये देण्याच्या दृष्टीने कार्यवाही करावी अशी मागणी केली आहे.
“मागिल सतत अनेक वर्षापासून मजुरांचे प्रश्न निकाली काढण्यात यश आले. तसेच अनेकदा वनविभाग वरिष्ठांशी संपर्क केला असता मजुरांचा समस्या सोडविल्या आहे. अनेक असे प्रश्न सामोर देखिल सोडविणार – विजय पिदुरकर (मा. जि. प. सदस्य).
——————————————————————-
“कागदो पत्री लढा संघटनेनेही अतिशय चांगल्या प्रकारे पाठलाग करीत तेंदुपत्ता संकलन मजुराचा प्रश्न हाती घेत न्याय मिळवून देण्यात त्यांचाही मोलाचा वाटा आहे.”