•काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस रमण डोये यांचा पत्रकार परिषदेत आरोप….
नागेश रायपूरे, मारेगाव:- सततच्या अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसान भरपाई चे अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यात लवकरच जमा होणार असल्याचे आश्वासन प्रसार माध्यमातून मोठ्या गाजावाजा करत सरकार जाहीर करत आहे.परंतु जिल्ह्यालाच निधी आतापर्यंत प्राप्त झाला नाही तर तालुक्याला येणार तरी कधी? असे वास्तव उघडकीस आल्याने, हे ईडी सरकार शेतकऱ्यांची दिशाभूल करणारे व शेतकऱ्यांच्या जखमेवर मिठ चोळणारे आहे, यांचेवर फसवणुकीचे गुन्हे दाखल व्हायला पाहिजे असे सणसणी आरोप काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस रमण डोये यांनी स्थानिक विश्रामगृह येथे पार पडलेल्या पत्रकार परिषदेत केला आहे.
मारेगाव तालुक्यात झालेल्या सततच्या अतिवृष्टीने, नदी नाल्या काठावरील हजारो हेक्टर शेतजमीनी पुराच्या पाण्याखाली येवून शेतातील उभे पिके पूर्णतः उध्वस्त झाले.त्या नुकसान भरपाईच्या मदतीसाठी शेतकरी बांधव एखाद्या चातक पक्षा प्रमाणे वाट पाहत असतांना, तो नुकसान भरपाईचा निधी जिल्ह्याला प्राप्त झाल्याचे विविध प्रसार माध्यमातील वृत्तपत्रात बातम्या प्रकाशित झाल्याने शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर हास्य फुलले. परंतू नुकसान भरपाई चा कुठलाच निधी वास्तवात जिल्ह्याला आला नसल्याचे वास्तव समोर आले आहे.
आलेल्या नैसर्गिक संकटामुळे शेतकरी बांधव पुर्वीच हवालदिल असतांना, शेतकऱ्यांना हे सरकार खोटी आश्वासने देवून दिशाभूल करत,शेतकऱ्यांच्या ओल्या जखमांवर मीठ चोळण्याचे काम करत आहे.,या सरकारचा जाहीर निषेध करुन यांचेवर फसवणुकीचे गुन्हे दाखल व्हायला पाहिजे असे सणसणीत आरोप पत्रकार परिषदेत काँगेसचे जिल्हा सरचिटणीस रमण डोये यांनी केला आहे.यावेळी तालुका काँग्रेस कमेटीचे तालुका अध्यक्ष मारोती गौरकार,शेतकरी आत्मा मिशनचे माजी अध्यक्ष मारोती डोये उपस्थित होते.
(प्रतिक्रिया) " नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना शासनाकडून जिल्हा पातळीवरून कुठलाही निधी तालुक्याला प्राप्त झाला नाही'.- दीपक पुंडे- (तहसीलदार, मारेगाव)