•महिलांचे उपोषण संवेदनशील तरीही प्रशासान कोमात
•प्रशासनाने आर्थिक साटेलोटे झाल्याचीही चर्चा…..
अजय कंडेवार,वणी:– राजूर येथे वेगवेगळ्या कंपनीच्या आगमनाने सुरू झालेल्या कोळसा सायडिंग साठी येथील राहिवासीयांना घरे खाली करून देण्याचा नोटिसांमुळे सुरू केल्या गेलेल्या राजूर बचाव संघर्ष समिती च्या महिलांच्या बेमुदत आमरण आजचा 7 वा दिवस आणी दिवाळीचा तोंडावरही गाव बचावासाठी खंबीर रुपात बसलेले उपोषण कर्त्याची हालत गंभिर असली तरीही गावासाठी काहीही….अशी जणू प्रतच केलेली दिसुन येत आहे.
रहिवासी क्षेत्रालगत ह्या कोळसा सायडिंग उभारण्यात आल्याने गावात प्रचंड वायू, जल व ध्वनी प्रदूषण होत असून येथील नागरिकांना अनेक दुर्धर रोग होत आहेत. ह्यातच घरे खाली करण्याचा प्रश्न उपस्थित झाल्याने येथील नागरिकांवर दुहेरी संकटासहित शारीरिक, मानसिक व आर्थिक त्रास वाढला आहे. अश्या संकटात सापडलेल्या नागरिकांनी राजूर बचाव संघर्ष समिती चे माध्यमातून एकत्र येत 1) गावातून प्रदूषण निर्माण करणारी व अवैधरित्या सुरू असलेल्या कोळसा सायडिंग गावातून हद्दपार करा, 2) गावकऱ्यासाठी असलेल्या मुख्य रस्त्यावरील जड वाहतूक बंद करा व 3) रेल्वे व वेकोली कडून विस्थापित करण्याअगोदर पुनर्वसन करून नुकसानभरपाई द्या. ह्या मागण्यांसाठी गेल्या 10 महिन्यांपासून अनेकदा निवेदने, दोनदा रास्ता रोको आंदोलन केले व आता दि. 17 ऑक्टो. पासून महिलांचे बेमुदत आमरण उपोषणाला सुरू करण्यात आली. ह्या उपोषणाला वणी विभागातील सर्वच राजकीय पक्ष व संघटनांनी पाठिंबा दिला आहे.
परंतू प्रशासन आजही त्यावर निर्णय अपूर्ण देत असल्यची माहिती आहे.संघर्ष समिती सदस्यांनी “आधी पुनर्वसन व नंतर विस्थापन” ह्या मागणीवर ठाम आहे परंतू प्रशासन सुस्तही दिसुन येत आहे. यावर काय मार्ग निघेल याकडे बघणे आता गरजेचे…..!!!!