•वणीचा ठाण्याचा इतिहासात पहिल्यांदाच घडलय.
•यंत्रणाही अवाक्, अनेकांचे अश्रू अनावर
अजय कंडेवार,वणी:- येथील पोलीस ठाण्यातील PSI डोमाजी भादिकर हे 34 वर्षाचा प्रदीर्घ सेवेनंतर 31 मार्च रोजी सेवानिवृत्त झाले. त्यांना ठाण्यातील पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या वतीने भावपूर्ण निरोप देण्यात आला.Thanedar himself gave a shock to the government car.!This is the first time in the history ofWani police station.the system is also speechless, tears of many.
?वणी येथील P.I चे माणुसकीचे दर्शन…….
पोलीस अधिकारी म्हणजे तापट माणूस, हा गैरसमज इतिहासजमा होण्याची वेळ आली आहे. होय, प्रामाणिकपणा दिसला की कर्तव्यकठोर अधिकारीही…. साध्या ASI च्या पदावरून पदोन्नती PSI पद आणि अश्याही व्यक्तीचा निरोप सत्कारासाठी आपुलकीने उभा राहतो.अशीच एक बाब ” माणसाने माणसाशी माणसा सम वागण्याची नितीच दर्शनही वणी ठाण्यात पहिल्यांदाच घडलं.अवघ्या काही दिवसाआधी डोमाजी भादीकर यांना पदोन्नती ASI च्या पदावरून PSI आणि आज रोजी डोमाजी भादिकर यांचा सेवानिवृत्ती समारंभाला खुद्द वणी पोलीस ठाण्यातील ठाणेदार P.I प्रदिप शिरस्कर यांनी विशेष उपस्थिती दर्शवून ‘पद नव्हे कामच मोठे’ हा मंत्र अवघ्या समस्त पोलीस यंत्रणेच्या मनावर एक अविस्मरणीय प्रसंग घेऊन ठसविला.
आज दिनांक 31 मार्च रोजी डोमाजी भादिकर पोलीस स्टेशन वणी हे 34 वर्षे सेवा केली.तसेच खात्यातून सन्मानाने निवृत्त झाल्याने पोलीस निरीक्षण वणी यांनी पत्नीसह भावनिक डोमाजी भादिकर यांचा सपत्नीक असा निरोप समारंभ वणी ठाण्यातच ठेवला. त्त्यात विशेष बाब अशी की, खुद्द वणी ठाणेदार P.I प्रदिप शिरस्कर व अधिकारी यांचा मार्फत शासकीय गाडीला भरगच्च फुलांनी सजवून त्या भादिकर दांमत्याना आदरपूर्वक बसविले आणि त्या शासकीय गाडीला धक्का मारीत त्यांना पोलीस आवारातून भावनिक आणि अविस्मरणीय निरोप येथीलच पोलीस अधिकारी, शिपाई, महिला कर्मचारी यांनी दिला.तसेच त्यांना पुढील सुखदायी जीवनाचा शुभेच्छाही दिल्या.आकर्षक बाब हिच की,वणीचा ठाण्याचा इतिहासात पहिल्यांदाच असा निरोप समारंभ घडलय यात काही शंका नाही. आणि हा समारंभ पाहून यंत्रणाही अवाक्, अनेकांचे अश्रूही अनावर झाले.