Ajay Kandewar,Wani:- पंतप्रधान नरेंद्र मोदींचा 75 वा वाढदिवस “सेवा पंधरवडा” म्हणून साजरा करण्याचे आवाहन भारतीय जनता पक्षाने केले असून, या उपक्रमाद्वारे मोदींची ‘जनसेवक’ ही प्रतिमा जनतेपर्यंत पोहोचवली जाणार आहे. वणी येथे झालेल्या पत्रकार परिषदेत माजी आमदार तथा वणी विधानसभा प्रमुख बोदकूरवार यांनी ही माहिती दिली.ते म्हणाले की, सेवा पंधरवडा हा केवळ औपचारिक उत्सव नसून, तो सामाजिक जबाबदारी, पर्यावरणपूरक उपक्रम, स्वदेशी वस्तूंचा प्रचार आणि जनजागृतीचे माध्यम ठरेल. “एक पेड माँ के नाम”, “नमो वन” आणि स्वच्छता अभियानाद्वारे सामाजिक तसेच भावनिक ऐक्य निर्माण करण्याचा प्रयत्न होईल, असे ही त्यांनी सांगितले.

•17 सप्टेंबर : महाआरोग्य शिबिर
बाजोरिया लॉन, वरोरा रोड, वणी येथे सकाळी 9 ते सायंकाळी 5 दरम्यान महाआरोग्य शिबिर. नागपूरच्या लता मंगेशकर हॉस्पिटलचे तज्ज्ञ डॉक्टर हृदयरोग, दंत, स्त्रीरोग, अस्थिरोग, बालरोग, नेत्ररोग, त्वचारोग, मानसशास्त्र आदी विभागातील रुग्णांची तपासणी व उपचार करणार.
•20 सप्टेंबर : नमो नेत्र संजीवनी शिबिर
जैताई मंदिर परिसरात सेवाग्राम येथील तज्ज्ञ नेत्ररोगतज्ज्ञांकडून डोळ्यांची तपासणी व आवश्यक उपचार.
•21 सप्टेंबर : स्वच्छता अभियान
सकाळी 6 वाजता वणी बसस्थानकावर व सकाळी 7 वाजता ग्रामीण रुग्णालय परिसरात व्यापक स्वच्छता मोहीम.
22 सप्टेंबर ते 1 ऑक्टोबर : आयुष्मान भारत कार्ड वितरण
वणी शहरातील 14 प्रभागांत मुख्य दुर्गादेवी पंडालाजवळ नागरिकांना मोफत आयुष्मान भारत कार्ड उपलब्ध करून दिले जाणार.
25 सप्टेंबर : पं. दीनदयाल उपाध्याय जयंती
वणी विधानसभा क्षेत्रातील प्रत्येक बूथवर उत्साहात आयोजन.
•‘एक वृक्ष आईच्या नावाने’ अभियान
शहरातील सार्वजनिक ठिकाणे, शाळा व शासकीय कार्यालयांमध्ये वृक्षारोपण उपक्रम.
•‘वोकल फॉर लोकल’ जनजागृती
स्वदेशी वस्तूंच्या वापरासाठी जनसंपर्क अभियान.
•कार्यकर्ता मेळावा
एस. बी. हॉलमध्ये वणी विधानसभा क्षेत्रातील सर्व भाजप कार्यकर्त्यांचा भव्य मेळावा.
•2 ऑक्टोबर : समारोप कार्यक्रम
महात्मा गांधी व माजी पंतप्रधान लालबहादुर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त महापुरुषांच्या पुतळ्यांची स्वच्छता व पुष्पमालांद्वारे अभिवादन. याच दिवशी “सेवा पंधरवडा”*चा समारोप या सर्व उपक्रमांतून आरोग्य, स्वच्छता, पर्यावरणपूरक वृत्ती, स्थानिक उत्पादनांचा प्रचार आणि कार्यकर्त्यांमधील संघटनात्मक बळकटपणा साधला जाईल, असे भाजपा मंडळाकडून सांगण्यात आले.
या पत्रकार परिषदेत उपस्थित म्हणून माजी आमदार व वणी विधानसभा प्रमुख संजीवरेड्डी बोदकुरवार, तारेंद्र बोर्डे, दिनकर पावडे, विजय पिदुरकर, संजय पिंपळशेंडे, ऍड. निलेश चौधरी, कुणाल चोरडिया, संतोष डंभारे, पवन एकरे, महादेव खाडे, बालाजी भेदोडकर , हितेन आटारा, राहुल कुत्तरमारे , पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

