•तक्रारीवरून दोघाविरुद्ध गुन्हा दाखल…
अजय कंडेवार,वणी :- सिंधी कॉलोनीतील हॉटेलमध्ये शुल्लक कारणावरून बेदम मारहाण करण्यात आल्याची घटना घडली असुन दि. 18 ला शनिवारी रात्री 9 वाजताच्या सुमारास या प्रकरणी सुदामा साधवानी यांच्या तक्रारीवरून आरोपी सुधीर पेटकर व करण चूनारकर विरोधात रात्री उशिरा विविध कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला.तक्रारीनुसार तक्रारदार सुदामा हरीदासमल साधवाणी, वय 60 वर्ष, त्याचे गांधी चौक वणी येथे कुमार ड्रेसेस नावाचे दुकान असुन ते दुकान सुदामा व त्याचा मुलगा चालवितो. दि.18 रोजी दुकान सायंकाळी 7 वाजता चे सुमारास बंद करून घरी गेला .रात्री अंदाजे नऊ वाजताचा सुमारास जेवण करून नेहमी प्रमाणे सुदामा यांचे घराचे बाजुला असलेले क्वॉलीटी हॉटेल येथे येवुन हॉटेल मालक दिपक वाधवाणी यांचे सोबत बोलत असताना त्यावेळी त्यांचे हॉटेल मध्ये सुधीर पेटकर व त्यांचे सोबत एक इसम बसुन दोघेही जेवण करीत होते. त्यावेळी सुधीर पेटकर याने सुदामा याला “हमारे साथ खाना खाँ “असे म्हटले असता त्याने त्याला में घरसे खाना खाँ के आया हू असे उत्तर दिले. त्यावेळी सुधीर पेटकर याचे सोबत असलेला ईसम हा साले खाना खा नहीं तो पैसे दे, असे म्हणत त्याचे टेबलवरील काचेचा ग्लास हा सुदामा याचे अंगावर फेकुन मारला, व सुधीर पेटकर याने सुध्दा त्याचे हातातील काचेचा ग्लास उचलुन फेकला तो ग्लास सुदामा ला उजवे हाताचे कोपऱ्यावर लागला.
दुसऱ्या इसमाने हॉटेल मधील लोखंडी गरम तवा घेवुन सुदामा च्या तोंडावर फेकुन मारला व सुधीर पेटकर याने हॉटेल मधील कुकर उचलुन सुदामाच्या डोक्यावर मारत असतांना, त्यास अडवले त्यावेळी त्याचे सोबत असलेला साथीदार याने सुदामा याला साले तु हमारे बिलके पैसे कैसे नही देता” असे म्हणत त्याचे हातातील 10 ग्रॅम सोन्याची अंगठी किं. अं. 25000/- रूपयांची जबरीने हिसकावुन घेतली व सुधीर पेटकर याने टेबल वरील काचेचा ग्लास टेबलवर फोडुन दोघेही त्याचे सोबत झटापटी करीत असतांना सुधीर पेटकर याचे हातातील फुटलेला काचेचा ग्लासाचे टोक त्याचे सोबत असलेल्या साथीदाराचे हनुवटीला लागला. सुदामा आपला जिव वाचविणे करीता तेथुन आपले घराकडे घाबरून पळून जात असताना ते दोघे ही मागे धावत आले व मागेच घरात घुसुन सुदामाला बाहेर ओढून मारहाण करीत पैसे मागत होते.
त्यावेळी वाचविण्याकरीता भाउ इंदर साधवाणी, पुतण्या कमल साधवाणी तसेच कॉलनी मधील इतर काही लोक मध्ये आले असता त्यांना सुध्दा सुधीर पेटकर व त्याचा साथीदार यांनी इंदर व पुतण्या यांना सुध्दा थापडबुक्यांनी मारहाण केली व शिवीगाळ करून जीवे मारण्याच्या धमक्या दिल्या अशा तक्रारीवरून आरोपी सुधीर पेटकर रा. वणी व त्याचा साथीदार दुसऱ्या आरोपीचे नाव करण चूनारकर वय 38 , रा. दामले फैल यांचेविरुध्द वणी पोलिस स्टेशन येथे विविध कलमाअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असुन पुढील तपास API दत्ता पेंडकर करीत आहे.