अजय कंडेवार, वणी : जिल्हा परिषद निवडणुकीचा ताप चिखलगाव-राजूर गटातही उसळला आहे. युवा उद्योजक फैजल बशीर खान यांनी दि.१० नोव्हेंबर रोजी उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाकडून आपला उमेदवारी अर्ज सादर केला. या प्रसंगी तालुकाप्रमुख, विधानसभा प्रमुख व शिवसेनेचे प्रमुख पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
फैजल खान हे “राजूर राष्ट्रवादी” निर्माते बशीर खान यांचे चिरंजीव असून, बशीर खान यांनी कधीकाळी या गटात संजय देरकर यांना खांद्याला खांदा लावून उभे केले होते. त्यावेळी राष्ट्रवादीची मोठी फळी निर्माण झाली होती. मात्र, आ.देरकर आता उबाठा गटात गेल्याने राजूर-चिखलगाव भागात नवे समीकरण आकार घेत आहेत.फैजल खान यांनी आज ‘हक्काची मागणी’ करत पहिल्यांदाच उमेदवारी दाखल केली असून, त्यांच्या पाठिशी युवक, समाजबांधव आणि जुना देरकर गट एकत्र उभा राहिल्याची चर्चा आहे. या पार्श्वभूमीवर संजय देरकर यांची भूमिका आता चर्चेच्या केंद्रस्थानी आली आहे. आता हे बघणे महत्त्वाचे आहे की, फैजलची हक्काची मागणी आ. देरकर पूर्ण करतात का? की जुना गडी यांनाच चान्स याकडे लक्ष. आ.देरकर हे बशीर खान परिवाराला दिलेला शब्द पाळतात की ,उद्धव गटात जुनाच चेहरा पुढे करून समीकरण बदलतातया प्रश्नांवर सध्या राजूर-चिखलगाव राजकारणात खमंग चर्चा रंगली आहे. फैजल खान यांच्या उमेदवारीने गटात नव्या राजकीय वळणाची चाहूल लागली .

