Ajay Kandewar,वणी : येथील तहसील कार्यालयाच्या आवारातील सेतू सुविधा केंद्र मागील दोन महिन्यांपासून कारभार बंद आहे. ते तत्काळ सुरू करावे, अशी मागणी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष, आर. टी.आय संघटना व सामान्य नागरिकांचा वतीने येथील उपविभागीय अधिकारी यांचे मार्फत जिल्हाधिकारी यांना करण्यात आली आहे.
सध्या दहावी, बारावीची परीक्षा सूरू आहे आणि काहीं दिवसांत निकाल लागतील आणि पुढील वर्षाच्या प्रवेशप्रक्रियेला सुरुवात होणार आहे. मात्र, सेतू सुविधा केंद्र बंद असल्यामुळे कागदपत्रे कशी मिळवावीत, असा प्रश्न विद्यार्थ्यांसमोर उभा ठाकला आहे . याचा गैरफायदा खाजगी महा-ई-सेवा केंद्र संचालक घेत आहे .विविध प्रमाणपत्राचे दाखले, सातबारा हे महा-ई-सेवा केंद्रांमार्फत दिली जातात. मात्र, केंद्र चालक वाजवी दरापेक्षा जास्त प्रमाणात पैसे घेतात. प्रमाणपत्र वितरीत करण्यास अडवणूक करून आर्थिक लुबाडणूक करतात व प्रमाणपत्रही वेळेवर दिले जात नाही, असा आरोप निवेदनात करण्यात आला आहे. त्यामुळे तहसील कार्यालयातील सेतू सुविधा केंद्र सुरू करण्यात यावे. जेणेकरून जनतेची लुबाडणूक न होता शासनाने निश्चित केलेल्या वाजवी दरामध्ये व विहित मुदतीत जनतेला विविध प्रमाणपत्रांचे दाखले मिळतील. त्यामुळे सेतू सविधा केंद्र सुरू करावे, अशी मागणी करण्यात आली आहे.ग्रामीण भागातील नागरिकांना शासकीय कागदपत्रे काढण्याकरिता तहसील परिसरातील असलेल्या सेतू सुविधा केंद्रात सोईचे असल्याने येत असतात. त्यामुळे ते इतर कुठेही न जाता शासकीय कार्यालयातच कागदपत्रे काढण्याकरिता येत असतात. परंतु कागदपत्रे काढण्याकरिता आलेल्या नागरिकांना हे तहसील परिसरातील सेतू सुविधा केंद्र गेल्या दोन महिन्यांपासून बंद असल्याने नागरिकांना आल्या पावले परत जावे लागत आहे. त्यामुळे त्यांना नाहक त्रास करावा लागत असून परिणामी त्यांना आर्थिक भुर्दंड सुद्धा सोसावा लागत आहे. म्हणून ताबडतोब तहसील परिसरातील सेतू सुविधा केंद्र सुरू करण्याची मागणी केली आहे.
यावेळी कॉ. ॲड. कुमार मोहरमपुरी, कॉ. ॲड. दिलीप परचाके, ॲड. विप्लव तेलतुंबडे, ॲड. अविनाश बोधाने, ॲड. प्रवीण पुरी, ॲड. अमान एम आरिफ, कॉ. कवडू चांदेकर, कॉ. लालू दडांजे, कॉ. भीमराव आत्राम,अब्दुल निसार , गुलाम रसूल, व दादाजी पोटे आदींनी उपविभागीय अधिकारी यांचे मार्फत जिल्हाधिकारी यांना केली आहे.