•मादगी बहुउद्देशीय संस्थेकडून विनम्र अभिवादन.
अजय कंडेवार,वणी:-या विश्वात प्रत्येक माणूस आपली विशेष ओळख घेऊन जन्माला येत असतो. त्यामध्ये संत- महात्मे, सुधारक, विचारवंत, कलाकार, साहित्यिक यांचा आवर्जून उल्लेख करता येईल. यापैकीच साहित्यक्षेत्रातील अंबराच्या तारांगणात एक तेजोमय शुक्रतारा ‘लोकशाहीर अण्णाभाऊ साठे’ या नावाने चकाकला.अशा या साहित्यसम्राट आणि लोकशाहीरास (दि.1 ऑगस्ट) रोजी सकाळी 9 वाजता वणी येथे मान्यवरांचा हस्ते प्रतिमेला माल्यार्पण करीत 103 वी जयंती ” मादगी बहुउद्देशीय संस्थेकडून “उत्साहात साजरी करण्यात आली.Venus star of literature sector Annabhau Sathe in jubilee spirit.Greetings from Madagi Multipurpose Organization.
यावेळी यावेळी उपस्थित मान्यवरांनी अण्णाभाऊ साठे यांचे काही प्रसंग सांगितले व मौलिक मार्गदर्शन केले. यावेळी मादगी बहुउद्देशिय संस्थेचे अध्यक्ष निलेश परगंटीवार, उपाध्यक्ष माजी नायब तहसिलदार चरणदास कोंडावार, सचिव सुरज चाटे, सहसचिव रवी कोमलवार, कोषाध्यक्ष नत्थुजी नगराळे, विक्की परगंटीवार, अरुण एनपल्लीवार, शिवकुमार नलभोगे, सदाशिव मंगलपवार, हरिदास गजलवार, किशोर , संदेश नगराळे आदी मादगी समाजाचे समाजबांधव उपस्थित होते.