•आर.सी ऑफिस जवळ अचानक वाघाचा कर्मचाऱ्यावर हल्ला…
अजय कंडेवार,वणी:- येथून जवळच असलेल्या वेकोलि वणी क्षेत्राच्या नीलजई-२ कोळसा खाणीत मंगळवार २७ डिसेंबर रोजी सायंकाळी ६ वाजताच्या सुमारास केशव बापुराव नांदे (५६) यांच्यावर आरसी ऑफिस जवळ वाघाने हल्ला केला. हे बघून तेथील काही कामगारांनी आरडाओरडा करीत धाव घेतली त्यामुळे वाघाने पळ काढला.
केशव बापुराव नांदे हे वेकोलि वणी क्षेत्राच्या नीलजई-२ कोळसा खाणीत फिटर पदावर कार्यरत आहे. सायंकाळच्या सुमारास ते आरसी ऑफिस जवळ काम करीत असतांना अचानक वाघाने त्याच्यावर हल्ला केला. बघून शेजारी काम करणाऱ्या काही नागरिकांनी आरडाओरड करीत तिकडे धाव घेतली. त्यामुळे वाघाने तिथून पळ काढला. जखमी अवस्थेत केशव नांदे यांना घुग्घुस येथील राजीव रतन केंद्रीय चिकित्सालयात उपचारासाठी भर्ती करण्यात आले.याबाबत कळताच वेकोलि कामगार संघटनेच्या नेत्यांनी, भाजपा नेत्यांनी व त्यांच्या कुटुंबियांनी राजीव रतन चिकित्सालयाकडे धाव घेतली. पुढील उपचारासाठी केशव नांदे यांना चंद्रपूर येथे हलविण्यात आले. सायंकाळी ५ वाजताच्या सुमारास वेकोलि नीलजई-२कोळसा खाण परिसरात वाघाचे दर्शन झाल्याचे प्रत्यक्षदर्शिचे म्हणणे आहे.