•चिंचाळा येथील घटना.
माणिक कांबळे/ मारेगाव:- पोलीस स्टेशनच्या हद्दीत येत असलेल्या चिंचाळा येथील एका शेतकऱ्याच्या बैलजोडीला जिवंत विद्युत तारेचा स्पर्श झाला. या दुर्घटनेत बैलजोडी घटनास्थळीच दगावली.Salgadya jumped from the bullock cart and it happened.Incident at Chinchala.
चारूदत्त दातारकर रा. चिंचाळा असे विद्युत तारेचा स्पर्श होऊन बैलजोडी दगावलेल्या शेतकऱ्याचे नाव आहे.
सद्या उन्हाळी मशागतीचा हंगाम सुरु असल्यामुळे शेतकरी कामात व्यस्त आहेत. सकाळी दातारकर हे आपल्या सालगड्यासह शेतात बैलगाडी घेऊन जात असताना रस्त्यात पडणाऱ्या नाल्यात बैलजोडीला जिवंत विद्युत तारेचा स्पर्श झाला.घटनेचे गांभिर्य ओळखून शेतकऱ्यासह सालगड्यानी बैलगाडीवरून उडी मारली. त्यामुळे हे दोघेही बचावले. मात्र त्यांची बैलजोडी घटनास्थळीच दगावली असून लाखोचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त होत आहे.