•मॅकरुन शाळेची 100% निकालाची परंपरा कायम
अजय कंडेवार,वणी :- केंद्रीय शिक्षण मंडळाने दहावी व बारावी चा निकाल ऑनलाईन जाहीर केला. यात येथील मॅकरून स्टुडंट्स अकॅडमी शाळेने यशस्वी परंपरा कायम ठेवली आहे. यात दहावीत सार्थक वरारकर याने 97.60 टक्के गुण प्राप्त करत अव्वल येण्याचा मान पटकावला.Sarthak won the top position.Continuing the tradition of 100% result of Macaroon CBSE School
नुकताच केंद्रीय शिक्षण मंडळाने दि. 12 मे ला दहावी व बारावीचा ऑनलाईन निकाल जाहीर केला आहे. यामध्ये स्टुडंट्स अकॅडमी शाळेचा विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले आहे.संबंधित परिस्थिती लक्षात घेऊन सी.बी.एस ई. नी आखुन दिलेल्या नियमानुसार मॅकरुन स्टुडन्टस अकॅडमी शाळेच्या विद्यार्थ्यांनी आपली दरवर्षी ची 100% निकालाची परंपरा कायम ठेवली आहे.आणि 90% पेक्षाही अधिक गुण मिळवून भरघोस यश संपादन केले आहे.असे अतुल्य यश मिळवून विद्यार्थ्यांनी शाळेच्या व आपल्या पालकांच्या सन्मानात मोलाची भर घातली आहे.ह्यात ……विद्यार्थ्यांची नावे सार्थक वरारकर 97.6% डींकी शुगवानी 95.2%,सक्षम साहू 94.6% योगेश पिंपळकर 95%, विवेक खिरटकर 95%आर्या काटकर 94.4% रफिया रहमान 94.8% अनघा बोढे 94.6% अदिती येवले 90 %आदित्य माहुरे 94.6 % वंश ठाकरे 94.4% शर्वरी बोढके 94.3% या सर्व विद्यार्थ्यांनी यश संपादन केले.
मॅकरुन स्टुडंन्टस अकादमीच्या शाळेतील विद्यार्थ्यांच्या या यशाने त्यांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे. आणि इथला प्रत्येक विद्यार्थी या यशाचे श्रेय शाळेचे संस्थापक पी.एस.आंबटकर सर, उपसंचालक पियूष आंबटकर, प्राचार्या शोभना मॅम तसेच शाळेतील शिक्षकांना दिले.