•विवाहित प्रेमीयुगुलाची आत्महत्या.
अजय कंडेवार,वणी:- विवाहित प्रेमीयुगुलांनी झाडाला एकत्र गळफास लावून आत्महत्या केली. ही घटना झरी जामणी तालुक्यातील कोडपाखिंडीच्या शेतात गुरूवारी घडली असून ती शुक्रवार दि.29 सप्टेंबर ला सकाळीच उघडकीस आली.
मंदा अर्जुन गाऊत्रे (वय 30 वर्ष) आणि नामदेव गोविंदा खडसे (वय 33 वर्ष) असे मृतांची नाव आहेत. झरी तालूक्यातील कोडपाखिंडी गावातील नामदेव खडसे हा विवाहित असून त्याला 1 मुलगी व 1मुलगा आहे. तर मंदा अर्जुन गाऊत्रे या विवाहित महिलेला 2 मुली आहे. काही वर्षांपासून या दोघांमध्ये गप्प प्रेमसंबंध होते. अशी माहिती सूत्रांकडून मिळाली तसेच काही महिन्यांपूर्वी दोघेही पसार झाल्याचीही माहिती समोर आली आहे. घटनेच्या काही दिवसांपूर्वी दोघही गावातही परत आले परंतु त्यांच्या या नात्याला कुटुंबीयांनी नकार दिला होता. त्यांना” तो “विरह सहन न झाल्याने आत्महत्या केले असावे अशी चर्चाही घटनस्थळी रंगू लागली.
गुरुवारी गणपती विसर्जनच्या दिवशी सायंकाळी दोघेही एका शेत शिवारात गेले. तेथील झाडाला नायलॉन दोरी बांधून दोघांनीही गळफास घेतली. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहचले. घटना पंचनामा करून उत्तरीय तपासणीसाठी झरी येथील ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आले. पुढील तपास पोलीस करीत आहे