Ajay Kandewar,Wani:- तालुक्यांतील साखरा (दरा)येथील छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्सव समितीच्या वतीने शिवजयंतीनिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ‘शिवतीर्थ’ येथे सकाळी ९ वाजता अभिवादन कार्यक्रम घेण्यात आला. समितीचे अशोक पिदुरकर,दौलत खरवडे, प्रवीण नांदे,प्रमोद भगत ,विठ्ठल लोंढे,कैलास बोबडे,बाबाराव नांदेकर ,वामनराव नांदे ,अंकुश घुगूल बळिराम नांदेकर,गजानन नांदेकर ,भगवान चंदनकर ,सरपंच रजनी पिदुरकर यांनी छत्रपती शिवाजी महाराजांना पुष्ष अर्पण करून अभिवादन केले.
त्यानंतर शिवतीर्थ येथून सायंकाळी गावात भव्य पदयात्रा रैली काढण्यात आली. या रॅलीत शिवभक्तांनी पारंपारीक पद्धतीने भगवे फेटे परिधान करून हातात भगवे ध्वज घेत गावातील प्रमुख मार्गेने रॅली काढली. यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांचा. बाल शिवबाच्या साकारण्यात आलेल्या भूमिकेने लक्ष वेधून घेतले. तर चिमुकल्या बालिकांनी नृत्याद्वारे शिवरायांना अभिवादन केले. ढोल-ताशांच्या गजरात, भगव्या ध्वजांच्या लयबद्ध लाटांमध्ये शिवभक्तांच्या उत्साहाने अख्खा साखरा गाव भारावून गेले. डीजे, ढोल-ताशा पथकाच्या निनादात निघालेल्या या शोभायात्रेत शिवभक्त व ग्रामस्थ मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. या शोभायात्रेत महिला, तरुणी पारंपारिक वेशभूषेसह भगवा फेटा परिधान करून सहभागी झाल्या होत्या.