•कायर येथे मोहर्रम उत्साहात.
अजय कंडेवार,वणी :- हिंदू-मुस्लिम ऐक्याचे प्रतीक मानल्या जाणाऱ्या वणी तालुक्यातील (Kayar News) कायर मध्ये मोहर्रम आज (दि.29) जुलै.ला उत्साहात संपन्न झाला. यानिमित्ताने अनेक ‘सवारी व डोलाऱ्यांचा ‘भेटींचा अनोखा सोहळा ‘बस स्टँड चौकात’ पार पडला. हा सोहळा पाहण्यासाठी हजारो भाविकांनी कायर गावामध्ये उपस्थिती लावली होती. आज मोहर्रम दिवशी हा सोहळा पोलिसांचा चोख बंदोबंस्त्यात संपन्न झाला. विशेष हा सोहळा मुख्य रस्त्यावर असल्याने पोलिसांना चांगलीच कसरत करावी लागली यात मात्र शंका नाही.An attractive replica of riding and rocking.Moharram excitement at Kayar.
मोहर्रम उत्सव हा दहा दिवसांचा नियोजीत असल्याने बाहेर गावातील येणाऱ्या भावी भक्तांची जोरदार गर्दी असते. यात ‘सवारी व डोला’ यांची प्रतिकृती बनवून भक्त मंडळी खांद्यावर घेऊन उत्सव करीत असतात. या मोहर्रम उत्सवात बऱ्याच प्रमाणात ‘नवस’ करण्याचा व फेडण्याची प्रथा रूढ आहेत. यादरम्यान सिंधिवाढोना ,बाबापुर, परसोडा, महांकालपुर, पूरड आणि सैदाबाद या गावातील हजारो भाविक-भक्त येतात. विशेषतः या गावात शंभर वर्षापासून ही प्रथा सुरू आहे असे म्हटले जाते.
हिंदू-मुस्लिम बांधव एकत्र येऊन शेकडो वर्षांपासून रुढ असलेल्या ‘मोहर्रम ‘ उत्सवाची परंपरा या गावात आजही पाहावयास मिळते. दोन भाऊ धर्मयुद्धामध्ये शेवटच्या क्षणापर्यंत पराभव न पत्करता युद्धभूमीत लढत राहिले. यात त्यांना वीरमरण आले. याच घटनेचं स्मरण म्हणून मोहर्रम ‘ करण्यात येतो. या मोहर्रम निमित्त शिरपूर पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त होता. PSI राम कांडुरे, दिपक गावंडे,अनिल सुरपाम,आशिष टेकाडे व 7 होमगार्ड उपस्थित होते.