•शेतात पकडून सोडले जंगलात…..
देव येवले, झरी:- तालुक्यातील मुकुटबन येथील एका शेतात (दि. 1 शनिवार रोजी सकाळी 11.40 मोठा अजगर आढळला. सदर माहिती दानिश शेख या शेतमालकाने सर्पमित्र जगदीश कुडलवार ,कार्तिक नाईनवार व सोहेल सय्यद या टीमला दिली. सर्पमित्राने अजगराला पकडून जंगलात सोडले. सर्पमित्र जगदीश कुडलवार यांच्यामुळे अजगराला जीवनदान मिळाले. परतीच्या पावसाने सर्वत्र ओल पसरली आहे. त्यामुळे परिसरात असे जीव बाहेर येत आहेत.
झरी तालुक्यातील मुकुटबन येथील शेतकरी दानिश शेख यांच्या शेतात शनिवारी सकाळी भला मोठा अजगर दिसून आला. सदर माहिती शेतमालकाने मुकुटबन येथील सर्पमित्र
जगदीश कुडलवार यांना दिली.
सर्पमित्राने शिताफीने अजगराला पकडले. लगतच्या बीट नंबर सी 334 मध्ये जंगलात सोडले. यावेळी वनरक्षक वनविभाग मुकुटबनचे कर्मचारी कुणाल सावरकर व कार्तिक गोनलावार व समस्त सर्पमित्र टीमही उपस्थित होते. सध्याच्या काळात शेतकऱ्यांनीदेखील अत्यंत दक्षतेने शेतात काम केले पाहिजे.