Tuesday, May 13, 2025
HomeBreakingसराईत दुचाकी चोरटे ताब्यात......

सराईत दुचाकी चोरटे ताब्यात……

  • सराईत दुचाकी चोरटे ताब्य.. …..

•आणखी काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता

अजय कंडेवार,वणी :- शहरी भागात संधी मिळेल तेथून दुचाकी चोरणाऱ्या दोन सराईत चोरट्यांना वणी डीबी पथकाने आज दिनांक 28 शनिवार रोजी अटक केली. एकूण 5 दुचाक्या व 2मोबाईल एकुण किंमत 1 लाख 95 हजार /रू चा मुदद्देमाल जप्त करण्यात आली.त्यांच्याकडून आणखी काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता असल्याने त्यांची कसून चौकशीही सुरू असल्याची माहिती आहे.

मोहम्मद अब्दुल कादर चैम (वय २६ वर्ष )रा. हनुमान वार्ड मेनरोड ,वरोरा,रंजीत रंगराव किनाके (वय २५ वर्ष )रा. कॉलरी वार्ड वरोरा जि. चंद्रपुर अशी अटक केलेल्या चोरट्यांची नावे आहेत. वणी शहरात दुचाकी चोरीच्या वाढत्या घटनांच्या अनुषंगाने डीबी पथक हे अतिशय चाणाक्षरीत्या कार्य सुरू होते त्यातच ही माहिती मिळताच
डीबी पथकांनी चोरट्यांची शोध मोहीम सुरू असतानाच दिप्ती टॉकीज ,वणी येथे 2 तरुण संशयितरित्या दुचाकी बाळगून असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. या माहितीवरून पोलिसांनी सापळा रचला. त्यावेळी 2 सराईत चोरटे दुचाकी ऊभे असतांनाच डीबी पथकांनी या दोघांनाही ताब्यात घेऊन चौकशी केल्यानंतर प्रथम त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. दुचाकीचे कागदपत्रही नव्हते. त्यामुळे पोलिसांचा संशय बळावला. दोघांची कसून चौकशी केली असता त्यांनी दुचाकी चोरीची कबुली दिली.

सदरची कार्यवाही डॉ.पवन बंसोड पोलीस अधीक्षक यवतमाळ, पियुष जगताप अपर पोलीस अधीक्षक यवतमाळ,संजय पुज्जलवार उपविभागीय पोलिस अधिकारी वणी, प्रदिप शिरस्कर ,ठाणेदार पो.स्टे.वणी यांचा मार्गदर्शनात सपोनि माधव शिंदे, सुदर्शन वानोळे ,सुहास मंदावार,विठल बुरूजवाडे,हरीन्द्रकुमार भारती,संतोष अढाव,पुरूषोत्तम डडमल यांनी केली.


RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular

Most Popular

Recent Comments