● कार्यक्रमात सहभागी होण्याचे आयोजकांचे आवाहन.
अजय कंडेवार,वणी– स्वातंत्र्य, समता व बंधुत्व, अहिंसावाद, विज्ञानवाद व मानवतावाद या गोष्टी ज्या धम्मात सांगितल्या आहेत, त्या धम्माचे संस्थापक महाकारुणिक तथागत गौतम बुद्ध यांच्या पूर्णकृती मूर्तीची प्रतिष्ठापना दि. १ जून २०२३ रोज गुरुवारला सम्यक बुद्ध विहार, मेघदूत कॉलनी, चिखलगाव येथे करण्यात येत आहे तसेच ह्या निमित्ताने यासोबत विविध कार्यक्रमाचे आयोजन सुद्धा करण्यात येत आहे.Installation of Buddha statue at Samyak Buddha Vihar on 1st June..Organizers’ call for participation in the event
सकाळी १०:३० वाजता भंते ज्ञानज्योती महाथेरो व त्यांचा संघ, संघाराम गिरी ता. वरोरा येथील भंतेजीचे भोजनदान होईल. दुपारी १२:३० ते ३ वाजेपर्यंत सम्यक बुद्ध विहार बुद्ध मूर्तीची प्रतिष्ठापना व धम्मदेसना कार्यक्रम होईल.दुपारी ३:३० वाजता व्याख्यानचा कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मा. प्रा. डॉ. विश्वजीत कांबळे, पांढरकवडा हे राहतील व ते “बुद्ध साहित्य आणि संस्कृती” या विषयावर मार्गदर्शन करतील. प्रमुख अतिथी म्हणून विजय खोब्रागडे पांढरकवडा, रूपाली कातकडे (सरपंच चिखलगाव), सुनील कातकडे( उपसरपंच चिखलगाव), अतुल चांदेकर (सदस्य ग्रा पं. चिखलगाव), सुचिता भगत (सदस्य ग्रा. प चिखलगाव ) हे उपस्थित राहतील.
सायंकाळी ७ वाजता “कारवा निळ्या पाखरांचा” हा बुद्ध भीम गीतांचा बहारदार कार्यक्रम अजिंक्य तायडे व शुद्धोधन पाटील ह्यांचा सादरीकरणात होईल. या संपूर्ण कार्यक्रमाचे स्वागताध्यक्ष म्हणून विशाखा बहुउद्देशिय महिला मंडळ यांच्या अध्यक्ष लिला वासेकर या राहतील.
कार्यक्रमाला बहुसंख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन विशाखा बहुउद्देशीय महिला मंडळ, सम्यक बुद्ध विहार समिती, गौतमी महिला बचत गट व मैत्री पुरुष बचत गट मेघदूत कॉलनी, चिखलगाव यांनी केले आहे.