नागेश रायपूरे, मारेगाव:– स्वरधारा ग्रुप द्वारा आयोजित मारेगाव येथे संपन्न झालेल्या विदर्भ स्तरीय भव्य नृत्य स्पर्धेत समूह नृत्या मध्ये डी व्हायरस ग्रुप चामोर्शी व पिएटी ग्रुप नागपूर तर एकल नृत्यात सुरज धनुष्कर व जय कैथवास यांनी प्रथम पारितोषिक मिळविले.
शहरात नेहमी सामाजिक,धार्मिक, सांस्कृतिक उपक्रम राबविण्यास सक्षम असणाऱ्या स्वरधारा ग्रुप च्या वतीने येथील नगर पंचायत च्या भव्य पटांगणात 29 जानेवारी रोजी विदर्भ स्तरीय एकल व समूह नृत्य स्पर्धा संपन्न झाली. या कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी माजी जि. प.सदस्या अरूणाताई खंडाळकर ठाणेदार राजेश पुरी, जनहित कल्याण संघटनेचे संस्थापक अध्यक्ष गौरीशंकर खुराणा, कुंभा येथील सरपंच अरविंद ठाकरे, जेष्ठ नेते गजानन किन्हेकर, कला महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा.डॉ. अविनाश घरडे, जनहित कल्याण महिला संघटनेच्या अध्यक्षा सौ.कविता मडावी तसेच इतर पदाधिकारी आदी मान्यवर उपस्थित होते.
या नृत्य स्पर्धेत विदर्भातील काना कोपऱ्यातील नृत्य कलावंत सहभागी झाले होते. या स्पर्धेत जनहित कल्याण संघटने तर्फ सर्व पारितोषिक ठेवण्यात आले होते. समूह नृत्यात डी.व्हायरस ग्रुप चामोर्शी व पिएटी ग्रुप नागपूर यांना विभागून रोख वीस हजार प्रथम पारितोषिक व सिल्ड देण्यात आले तर भवानी डान्स ग्रुप वेलोदी, नवरंग डान्स ग्रुप बल्लारपूर यांना विभागून रोख पंधरा हजार द्वितीय पारितोषिक व सिल्ड तर आम्रपाली ग्रुप नागपूर तृतीय याना रोख दहा हजार व सिल्ड देण्यात आले. तसेच मोरणी ग्रुप विद्यानिकेतन इंग्लिश मिडीयम स्कुल मारेगाव, प्रयास स्कुल कायर, जे.बी. ग्रुप वणी यांना रोख हजार रुपये व सिल्ड प्रोत्साहनपर देण्यात आले. तसेच एकल नृत्य स्पर्धेत सुरज धनुष्कर व जय कैथवास यांना विभागून प्रथम पारितोषिक रोख दहा हजार व सिल्ड, कुणाल मोहोड यांना द्वितीय पारितोषिक रोख सात हजार व सिल्ड तसेच मिताली पांडे यांना तृतीय पारितोषिक रोख पाच हजार व सिल्ड देण्यात आले. तर सावरी सातपुते, जीविका चौधरी, आसता वांढरे यांना प्रोत्साहनपर रोख हजार व सिल्ड देवून मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.
या कार्यक्रमासाठी स्वरधारा ग्रुप चे नागेश रायपूरे, अशोक कोरडे, विवेक बोबडे, विशाल किन्हेकर, संदीप आत्राम, श्रीकांत सांबजवार, शेख इफतेखार,सचिन देवाळकर,उमर शरीफ,आकाश येरमे, प्रा.राजेश घुमे, दिलदार शेख,आशिष येरने,निखिल कोरडे, हरीश नेहारे,गजानन मुके, आनंद नक्षणे, तुषार शेंडे,मोहन शेंडे, आशिष दानखडे,विशाल परचाके अनिकेत माफुर, राजकुमार मोहितकर, लक्ष्मीकांत सयाम, प्रतीक वनकर, आकाश सोयाम, आदींनी परिश्रम घेतले तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अशोक कोरडे व प्रा. सतीश पांडे यांनी केले तर आभार नागेश रायपूरे यांनी मानले. तसेच या कार्यक्रमाला जनहित कल्याण संघटनेचे विशेष सहकार्य लाभले.