•लो.टी महाविद्यालयामध्ये युवती मार्गदर्शन शिबीर संपन्न
•उपविभागातील अनेक महाविद्यालयातील विद्यार्थ्याना Dysp ने केले समुपदेशन.
अजय कंडेवार,वणी :- लोकमान्य टिळक महाविद्यालयामध्ये राष्ट्रीय सेवा योजना व समाजशास्त्र विभागाच्या वतीने दि.22 ऑगस्ट ला युवती मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले.या कार्यक्रमाला प्रमुख मार्गदर्शक म्हणून मिलिंद पोंक्षे (जाणीव चॅरिटेबल ट्रस्ट मुबई ) तसेच गणेश किंद्रे(उपविभागीय पोलीस अधिकारी,वणी) लाभले होते. Students should be alert from the happenings in the society – Ganesh Kindre (Sub Divisional Police Officer, Wani)
युवतींना मार्गदर्शन करतांना पोंक्षे यांनी मुलींनी जीवन जगतांना कुठली काळजी घेतली पाहिजे यावर भाष्य केले आजकाल वयात आल्यावर मुलींना मुलांप्रती आकर्षण मोठ्याप्रमाणात असते . परंतु या आकर्षणातून मुली नको त्याठिकाणी फसतात नको त्यागोष्ठी केल्याने संपूर्ण जीवन उध्वस्त झालेलं असते किंवा मुलं युवतींना आपल्या जाळ्यात ओढून नको त्या अवस्थेतले फोटो काढून ब्लॅकमेल करतात व या घडणाऱ्या घटनांमुळे मुली पुरत्या हादरलेल्या असतात म्हणून मुलींनी जगताना सजग राहून जगले तर या अघटित घडणाऱ्या घटनांपासुन स्वतःला सुरक्षित ठेवू शकतील असे अनमोल मार्गदर्शन त्यांनी केले .
गणेश किंद्रे,उपविभागीय पोलीस अधिकारी,वणी यांनी समाजात घडणाऱ्या घटनांचा पाढाच विद्यार्थिनींना वाचून दाखविला आणि सतर्क राहण्याचा सल्ला दिला व गरज पडल्यास 112 वर फोन करून पोलिसांची मदत घेऊ शकता व अघटित टाळू शकता याची जाणीव विद्यार्थिनींना करून दिली. जसे की, मला जे हवे ते मी कसेही मिळविणारच, अशी प्रवृती आपल्या साथीदारावर हल्ला करण्याच्या घटनांना कारणीभूत आहे. त्यामुळे आपले पाल्य अशा मनस्थितीतून किंवा परिस्थितीतून जात असतील तर त्यांचे योग्य समुपदेशन व्हायला हवे. तसेच प्रेमसंबंध तुटले किंवा आणखी कोणताही प्रसंग आला तर त्यावेळी संयम बाळगला पाहिजे, अशी शिकवण मुलांना लहानपणापासूनच द्यायला हवी. तसे झाल्यास अशा प्रकारच्या घटना कमी होण्यास मदत होईल, असा विश्वास गणेश कींद्रे यांनी केला.
कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य प्रसाद खानझोडे यांनी विद्यार्थीनींना मार्गदर्शन करतांना वर्तमान युगात ज्ञान आणि विचार आपल्याकडे आहेत आपण जगतांना विवेकाने विचार करून पाऊल टाकले तर आपण समस्यांमध्ये फसणार नाही. त्यामुळे मुलींनी जास्तीतजास्त काळजी घेऊन पुढे पाऊल टाकावे असे विचार व्यक्त केले .तसेच कार्यक्रमाचे प्रास्ताविक व पाहुण्यांचा परिचय रासेयो कार्यक्रम अधिकारी प्रा.डॉ नीलिमा दवणे यांनी केले. कार्यक्रमाला प्रा किसन घोगरे उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन प्रा डॉ .विकास जुनगरी, रासेयो कार्यक्रम अधिकारी यांनी केले आणि सोनल सुरपाम या विद्यार्थिनीने आभार प्रदर्शन केले. कार्यक्रमाला मोठ्या संख्येने प्राध्यापक व विद्यार्थिनी उपस्थित होत्या.