★12 आशा सेविका म्हणून सेवा करणाऱ्या महिलांचा सत्कारही
अजय कंडेवार,वणी :- क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती दरवर्षी प्रमाणे याही वर्षी मोठ्या उत्साहात विविध स्पर्धा व प्रबोधनपर कार्यक्रम महिला समारोह समिती व बहुजन स्टुडंट्स फेडरेशन च्या वतीने राजूर येथील राष्ट्रीय विद्यालयाच्या पटांगणात दि. 3 ते 5 जानेवारी 2023 ला साजरा करण्यात आले.
तीन दिवसीय झालेल्या या कार्यक्रमात सामान्य ज्ञान परीक्षा स्पर्धा, रॅली, व्याख्यान, आशा सेविकांचा सत्कार, मेघे सावंगी दवाखानाचे आरोग्य तपासणी, अंध मुलांचा ऑर्केस्ट्रा, विदर्भ स्थरिय डान्स स्पर्धा, समापन कीर्तनकार सत्यपाल महाराज यांचा समाजप्रबोधनपर “सत्यपाल ची सत्यवानी” असे विविध प्रकाराने साजरा करण्यात आला.
दि.3 जाने ला सकाळी 10 वा अभिवादन मिरवणूक शालेय वाद्यवृदंसह राष्ट्रीय विद्यालय ते क्रां.सावित्रीबाई चौक काढण्यात आली. या मिरवणुकीत शालेय विद्यार्थी, महिला, युवक व गावकऱ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला. या मिरवणुकीचे विशेष आकर्षण म्हणजे अनेक युवतींनी सावित्रीबाईंनी वेशभूषा करून लखलखती मशाल हाती घेऊन सहभागी झाल्या होत्या. तसेच लेझिम पथक आकर्षक ठरले. यानंतर 10.30 वाजता मेघे आयुर्विज्ञान संस्था सावंगी मेघे यांच्या सहकार्याने सर्व रोग निदान व उपचार आरोग्य शिबिर घेण्यात आले.या शिबिरात स्त्री रोग तज्ञ, बालरोग तज्ञ, त्वचारोग तज्ञ, अस्थिरोग तज्ञ, चर्मरोग तज्ञ,नेत्ररोग तज्ञ व हृदयरोग-मधुमेह तज्ञ डॉक्टरांनी सहभाग घेऊन तपासणी केली तसेच औषध वाटप करण्यात आले.रक्तदान शिबिरात सुद्धा अनेक युवकांनी सहभाग घेतला. तसेच आवश्यक रुग्णांना दर शुक्रवार ला निःशुल्क बस सेवा सुरू केली.
या कार्यक्रमाचा केंद्रबिंदू म्हणजे उद्घाटनिय कार्यक्रमाचे उद्घाटक आमदार संजिवरेड्डी बोदकुरवार यांच्या हस्ते रीतसर कार्यक्रमाचे उदघाटन करण्यात आले. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी वणी पंचायत समिती माजी सदस्य अशोक वानखेडे तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून शिक्षणाधिकारी,जी.प. चंद्रपूर निकिता ठाकरे तसेच राज गुमनार तसेच प्रमुख पाहुणे म्हणून पोलीस उपनिरीक्षक माया चाटसे, जी. प.सदस्य संघदिप भगत, राजूर ग्रामपंचायत सरपंच विद्या पेरकावार, उपसरपंच अश्विनी बलकी, पोलीस पाटील वामन बलकी, शिक्षिका सरोज भंडारी, महेंद्र श्रीवास्तव, वसुंधराताई गजभिये, तसेच ग्राम पंचायत राजूर चे सदस्य गण विचारमंचावर उपस्थित होते. या उद्घाटनिय कार्यक्रमाचे संचालन रक्षा वानखेडे तर आभार प्रदर्शन महेश लिपटे यांनी केले.
या उदघाटन समारंभात गावातील प्राथमिक आरोग्य केंद्रातील 12 आशा सेविका म्हणून सेवा करणाऱ्या महिलांचा सत्कार करण्यात आला. सायंकाळी 6 वाजता वाशिम येथील चेतन सेवांकुर प्रस्तुत अंध मुलांचा ऑर्केस्ट्राने बहारदार गाणे सादर करून राजूर पंचक्रोशीतील जनतेचे मने जिंकले.दि 25 डिसें 2022 रोजी घेण्यात आलेल्या सामान्य ज्ञान स्पर्धेत प्रथम बक्षीस सूरज डोहे,द्वितीय प्राशिक कांबळे, तृतीय प्राची ताजने यांनी पटकावले. आले. या स्पर्धेचे परीक्षा प्रमुख म्हणून पल्लवी जगदीश धम्मप्रिय यांनी जबाबदारी सांभाळली.
दिनांक 4 जाने ला सायंकाळी 6 वाजता रोमहर्षक विदर्भस्थरीय नृत्य स्पर्धा थाटात पार पडली. दि 5 जाने
सायंकाळी सप्तखंजेरीवादक कीर्तनकार सत्यपाल महाराज यांचा समाज प्रबोधनपर “सत्यपाल ची सत्यवानी” मनोरंजनातून प्रबोधन,प्रबोधनातून क्रांती व्यसमुक्तीसाठी कीर्तनाचा कार्यक्रम पार पडला.
या नयनदीपक कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी महेश लिपटे ,रक्षा वानखेडे ,सुनीता,कुंभारे,अमोल वानखेडे,विक्की जंगले,अंकुश पेटकर, मारोती आत्राम,अभिलाष सोनेकर,अर्चना कडुकर,अश्विनी जंगले,प्रणिल कांबळे, तसेच महिला समोरोह समिती व बहुजन स्टुडंट्स फेडरेशन,राजूरच्या सर्व पदाधिकारी,सदस्य व कार्यकर्त्यांनी अथक परिश्रम घेतले.