•१२० हून अधिक विद्यार्थ्यांचा सहभाग
अजय कंडेवार,वणी:- सक्षम बहुद्देशिय संस्था व्दारा संचालित सक्षम इंग्लिश मिडीयम स्कुल,वणी द्वारा आयोजीत “ऊची उडान -२०२४ ” विविध सांस्कृतिक कार्यक्रम घेत व उल्लेखनीय यश मिळवणाºया विद्यार्थ्यांचा गौरव करत उत्साहात ता.५ फेब्रुवारी २०२४ रोजी वार्षिक सांस्कृतिक कार्यक्रम संपन्न झाले.
या कार्यक्रमात भारतीय संस्कृती, सण-उत्सव ,लोककला, शेतकरी नृत्य, सिनेगीतांवरील नृत्य, सादर करुन उपस्थितांची मने जिंकली. लहान मुलांची अभिनयक्षमता पाहून पालकांनी देखील उत्स्फूर्तपणे टाळ्या वाजवून दाद दिली. कार्यक्रमाची सुरुवातीलाच दिपप्रज्वलन व प्रतिमेला हाराअर्पण करण्यात आले.शंभरहून अधिक बालचिमुकल्यांनी हिंदी, मराठी, लावणी, सांस्कृतिक गीते विविध वेशभूषांमध्ये सादर केली. मुलांनी गायन, आदिवासी ,कोळी, शेतकरी, बॉलिवूड, गुजराती व मराठी नृत्यातून विविध कलाविष्कार सादर केले. स्नेहसंम्मेलनातील नृत्यांमध्ये आदिवासी नृत्य प्रेक्षकांच्या आकर्षणाचा केंद्र ठरले तर १२० विद्यार्थ्यांनी सांस्कृतिक कार्यक्रमात सहभाग घेतला तसेच शाळेतील २५ विद्यार्थांना “ऑल राऊंड बेस्ट परफॉर्मनस् अवॉर्ड” देत पाहुण्यांचा हस्ते भव्य सत्कार करण्यात आले.प्रमुख अध्यक्ष व प्रमुख पाहुण्यांनी भाषणात मुलांनी सादर केलेल्या कलागुणांचे व कार्यक्रमाचे भरभरून कौतुक केले.तसेच कार्यक्रमाच्या तयारीत सहभागी सर्व कलाकार, मुख्याध्यापक, शिक्षक आणि शाळेचा सदस्यांच्या मेहनतीचे व सांघिक कार्याचे त्यांनी कौतुक केले.या कार्यक्रमाचे संस्थेचे अध्यक्ष प्रास्ताविक कर्मा तेलंग,संचालन अमरीन खान तर आभाप्रदर्शन प्राजक्ता बेलेकर यांनी केले.
या कार्यक्रमाचे उद्घाटक शिक्षण विभागातील सतिश कुरेकार, सामाजिक कार्यकर्ते दिलीप मालेकर,प्रमुख अतिथी सेक्रेटरी ऑफ सक्षम बहु.संस्था वणीचे वैशाली तेलंग व सामाजिक कार्यकर्ते गौतम जिवने हे उपस्थित होते. या कार्यक्रमाचा यशस्वीतेकरीता आयोजक कर्मा तेलंग अध्यक्ष सक्षम बहुद्देशीय संस्था, वणी व शिक्षक वृंद व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.