•’द ग्रेट पीपल ग्रुप’ची राज्य शासनाला मागणी
अजय कंडेवार,वणी:- स्वातंत्र्य अमृत महोत्सवाच्या औचित्यावर घर घर तिरंगा लावून राष्ट्रप्रेम जागृतीचा संदेश दिला, त्याच प्रमाणे घरोघरी संविधान पुस्तिका वाटून एकोप्याचा संदेश द्या, अशी मागणी द ग्रेट पीपल ग्रुपच्यावतीने शासनाला निवेदनातून आली आहे.
केंद्र सरकारने स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त घर घर तिरंगा लावून देशभर राष्ट्रप्रेम जागृतीचा संदेश दिला, या संदेशाने प्रत्येकाच्या मनांमध्ये राष्ट्रप्रेम निर्मितीचा पाया रुजून बंधुभाव निर्माण केला. त्यांनी राबविलेल्या कार्यक्रमाने राष्ट्रप्रेमाचे पाईक ठरले.अन्यायाप्रती जागृती निर्माण करून मानवांमध्ये ज्ञानजागृती होऊन, राष्ट्रातील नागरिकांमध्ये समान नागरिक, समान संविधान प्रस्ताविकेच्या वाटप वोट, समान हक्क हाच एक संदेश पोहोचवा.
संविधानाची पुस्तिका वाटून घराघरात पोहोचवला तर खऱ्या ज्ञानाच्या जागृतीची दिशा प्राप्त होईल अशा आशयाचे निवेदन द ग्रेट पीपल ग्रुप यवतमाळवतीने दत्ता डोहे, डॉ. अतिक सय्यद, दिनेश रायपुरे, सुशिल अडकीने, गणेश खोके, अतिश राजुकार, सरगम ढेंगळे, नरेश ठाकरे, प्रीतम बांगडे, हर्षा रामटेके राहुल अहुजा, आकाश महाडोळे यांच्या उपस्थितीत संघटनेचे अध्यक्ष दत्तात्रय बोबडे व उपाध्यक्ष इजहार शेख यांच्या नेतृत्वात उपविभागीय अधिकारी व यांच्यामार्फत राष्ट्रपती मुर्मू यांना सादर केले.