अजय कंडेवार, वणी:- शहरातील एका पत्रकार संघटनेचे तडफदार अध्यक्ष तसेच बाहेरील संघटनेतील बातमीदार यांना वेळोवेळी सहकार्यातून भावना जपणारे तसेच सर्वाँना कोणतही क्षणी धाऊन जाणारे पत्रकार संदिप बेसरकर . त्यांचें वडील अशोक शिवाजी बेसरकर यांना आज दिनांक 1 फेब्रुवारी 2023 रोजी सायंकाळी 5 वाजता देवाज्ञा झाली.
मागील काही महिन्यांपासून अर्धांगवायू या आजाराने ग्रासले होते. अशोक बेसरकर आदिवासी समाजाच्या उन्नतीसाठी अनेक आंदोलनात सहभागी राहत होते तसेच अनेक वर्षापासून दैनिक वृत्तपत्रात बातम्या लिहत होते.
बेसरकर परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. त्यांच्या मागे एक मुलगा, मुलगी, सून, पत्नी, नातू असा आप्तपरिवर आहे. अशोक बेसरकर यांच्या पार्थिवावर दिनांक 2 फेब्रुवारी 2023 ला सकाळी 10.00 वाजता वणीच्या मोक्षधाम येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.