Ajay Kandewar,Wani:- बुधवार दिनांक 13 नोव्हेंबर रोजी शिवसेना (उबाठा) महाविकास आघाडीचे उमेदवार संजय देरकर यांचा नांदेपेरा- लाठी सर्कलमध्ये प्रचार दौरा झाला. त्यांनी नांदेपेरा, वांजरी, मजरा, रांगणा, शेलू, भुरकी, वडगाव, वायगाव बेसा, लाठी, निवळी, उकणी, तरोडा, बेलोरा इत्यादी गावांचा नागरिकांनी संजय देरकर यांचे स्वागत, सत्कार, फटाके फोडून व अक्षवंत करून त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या. तर भालर येथे मशाल रॅली काढण्यात आली. या रॅलीने चांगलेच लक्ष वेधले.
वणी मतदार संघात संजय देरकर यांच्या समर्थकांची संख्या मोठी आहे. सर्वसामान्य कार्यकर्ता त्यांच्याशी निष्ठेने जुळला आहे. हाच समर्थक वर्ग व निष्ठावान कार्यकर्ता त्यांच्या विजयासाठी दिवसरात्र झटत आहे. वणी विधानसभा क्षेत्रात संजय देरकर यांचा दणकेबाज प्रचार सुरु आहे. काँग्रेसचे माजी आमदार वामनराव कासावार, जेष्ठ नेते देविदास काळे, टिकाराम कोंगरे, आशिष खुलसंगे, महेंद्र लोढा हे संजय देरकर यांच्या प्रचाराची कमान सांभाळून आहेत. गावागावात, घरोघरी, दारोदारी जाऊन संजय देरकर यांचा प्रचार करीत आहेत. तसेच राष्ट्रवादीचे नेते विजय नगराळे हे देखील प्रचंड मेहनत घेत आहेत. शिवसेनेच्या नेत्यांनी तर संजय देरकर यांच्या प्रचारात स्वतःला झोकून दिले आहे. शिवसेनेचे दीपक कोकास, संजय निखाडे, सुनिल कातकडे यांच्यासह प्रत्येक शिवसैनिक निष्ठेने संजय देरकर यांच्या प्रचाराची धुरा वाहतो आहे.