अजय कंडेवार,वणी:- सहकार क्षेत्रात नावाजलेली व प्रतिष्ठित श्री.रंगनाथ स्वामी नागरी सहकारी पतसंस्था. या पतसंस्थेत 17 सदस्यीय संचालक मंडळ ,संपूर्ण महाराष्ट्र राज्य कार्यक्षेत्र, 22 शाखा व हल्ली 723 कोटीची ठेवी, सतत ऑडिट वर्ग A, उत्तम प्रगती अशी “विश्वासाची संस्था ‘ हे संस्थेचे ब्रीद आणि हे ब्रीद उराशी बाळगून अनेक चढ-उतारांचे साक्षीदार बनत आजवरचा प्रवास करणारी संस्था….. या नावाजलेल्या पतसंस्थेत अत्यंत कमी वेळात ग्राहक व संचालक मंडळाचा विश्वास जिंकत संजय निलकंठ दोरखंडे यांची अखेर संस्थेत कायमस्वरूपी मुख्य कार्यकारी अधिकारी (C.E.O) या पदावर 17 ऑक्टोबर 23 रोजी ॲड. देविदास पांडूरंग काळे (अध्यक्ष -रंगनाथ स्वामी पतसंस्था, कार्याध्यक्ष- यवतमाळ जिल्हा नागरी व पगारदार पतसंस्थाचा संघ, यवतमाळ )यांच्या मार्गदर्शनात व समस्त संचालक मंडळाचा विशेष उपस्थितीत कायमस्वरूपी नियुक्ती करण्यात आली.
श्री.रंगनाथ स्वामी नागरी सहकारी पतसंस्थेच्या CEO या पदाचा प्रभार म्हणून संजय दोरखंडे यांची सप्टेंबर महीन्यात 2022 रोजी नेमणूक करण्यात आली होती. संजय दोरखंडे 2003 मध्ये या संस्थेत लिपिक म्हणून रुजू झाले होते. आजपर्यंतच्या 20 वर्षाच्या सेवा कालावधीत त्यांनी शाखा व्यवस्थापक, उपकार्यकारी अधिकारी, व मेघश्याम तांबेकर यांचा निवृत्तीनंतर 1 वर्षांहून अधिक काळ प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून काम पाहिले आहे आणि मागिल वर्षभरात संजय दोरखंडे यांनी ग्राहक व संचालक मंडळात अवघ्या वर्षभरात एक वेगळीच छाप सोडली.त्यात ग्राहकहिताला प्राधान्य असलेली माहिती देणे , कर्ज वसुली,आर्थिक क्षेत्रातील बदलांविषयीचं मार्गदर्शन, त्याविषयी बँकेने स्वीकारलेली ग्राहकहिताची भूमिका, गुंतवणूक सल्ला, कर्ज सल्ला, नव्या सेवा, नव्या योजना या सर्व बाबतीत त्यांची ही शैली आगळीवेगळीच.. जणू याच कार्याची पावती त्यांना मिळाली यात काहीं शंका नाहीच….
“723 कोटी रुपयांच्या ठेवींचं ध्येय गाठण्यात आजपर्यंत यश आलं, ही याची सार्थ व सर्वोत्तम पावती आहे, असं अभिमानाने सांगावसं वाटतं की,येत्या काळात आपली ही संस्था 1000 कोटींचाही आकडा पार करणार आहे.यासमोर आता ग्राहकांची ठेवी सुरक्षित करण्याचें व सुविधा देण्याचे हेच एकमेव ध्येय असेल “.- मुख्य कार्यकारी अधिकारी (C.E.O)संजय निलकंठ दोरखंडे (C.E.O )