•कृषी विभागाचा असाही एक उत्तम उपक्रम
अजय कंडेवार,वणी:- तालुक्यात यावर्षी पावसाळयामध्ये सरासरी पेक्षा जास्त पाउस झाला आहे. त्यामुळे छोटया तसेच मोठया नाल्यांचा वाहता प्रवाह चालू आहे. वाहत्या प्रवाहाचे पाणी वनराई बंधायाव्दारे अडविल्यास त्याचा फायदा शेतीच्या पिकास नक्की होईल व रब्बी हंगामातील पिकांना संरक्षित सिंचनाची सोय व्हावी या संकल्पनेतुन गावोगावी श्रमदानातून वनराई बंधारे बाधण्याची मोहिम महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागामार्फत उपविभागिय कृषी अधिकारी पांढरकवडा जगन राठोड यांचे मार्गदर्शनामध्ये तालुका कृषी अधिकारी वणी कार्यालयाने हाती घेण्यात आली आहे.
श्रमदान व लोकसहभागातून वनराई बंधारे बांधणे या मोहिमेची सुरुवात वणी तालुक्यातील धुनकी गावातून वनराई बंधारा बांधुन करण्यात आली. त्या प्रसंगी उपविभागिय कृषी अधिकारी पांढरकवडा जगन राठोड यांनी धनराई बंधारा बांधल्यामुळे त्यापासून होणारे विविध फायदे जसे की वनराई बंधायामुळे पाणी पातळीत वाढ होणे, पिकाच्या संवेदनशील अवस्थे मध्ये पिकाना सिंचनाची गरज असतांना ति गरज वनराई बंधायांत साचलेल्या पाण्यातून पूर्ण करणे व जनावरांना पिण्याचे पाणी उपलब्ध होणे उपस्थित शेतकऱ्यांना सांगितले.
याप्रसंगी गावच्या सरपंच ज्योती मालेकर, मंडळ कृषी अधिकारी वणी आनंद बदखल, मंडळ कृषी अधिकारी कायर पवन कावरे, कृषी पर्यवेक्षक विशाल घुडे, कृषी सहाय्यक उमेश वाघमारे, गावचे सर्व प्रापंचायत सदस्य शंकर झाडे जगदिश तुरणकर, उमेश किनाके सह शेतकरी उपस्थित होते. या आतापर्यंत तालुक्यामधल गावामध्ये श्रमदान व लोकसहभागातून 30 वनराई बंधारे बांधण्यात आले आहे. या मोहिमेमध्ये तालुक्यातील शेतकरी गट, महिला गट स्वंयसेवी संस्था, गावचे लोकप्रतिनिधी, प्रगतशिल शेतकरी व शालेय विद्यार्थी यांनी सहभाग घ्यावा असे आवाहन तालुका कृषी अधिकारी वणी सुशांत माने यांनी केले आहे.