● कमळवेली येथे माकपचे पक्ष कार्यकर्ता शिक्षण शिबिर संपन्न.
देव येवले (झरी): “जगाचा इतिहास हा वर्ग संघर्षाचा इतिहास आहे” असे कार्ल मार्क्स सांगून गेले. शोषक आणि शोषित यांच्या संघर्ष शोषणाची व्यवस्था संपविण्यासाठी असून कार्ल मार्क्स यांच्या विचारावर आधारित कम्युनिस्टांचा जन्म झाला आहे. जग कसे आहे हे सांगणारे बहुतांश आहेत परंतु प्रश्न आहे जग बदलण्याचा, शोषणाला व शोषणावर आधारित समाजव्यवस्था बदलण्यासाठी मार्क्स ने जे सूत्र दिले त्या सूत्रानुसारच हे होऊ शकते”,असे प्रतिपादन मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या कमळवेली येथे झालेल्या पक्ष शिक्षण शिबिरात कॉ. शंकरराव दानव यांनी केले.
मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे दिनांक 14 सप्टेंबर ते 24 सप्टेंबर दरम्यान पक्ष कार्यकर्ता शिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. त्यानुसार दिनांक 14 सप्टेंबरला झरी तालुक्यातील कमळवेली येथे पक्ष कार्यकर्त्यांना शिबिर घेण्यात आले. या शिबिराला पक्षाचे राज्य कमिटी सदस्य कॉ. शंकरराव दानव, जिल्हा सचिव कॉ. कुमार मोहरमपुरी, ऍड.दिलीप परचाके हे प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित होते तर शिबिराचे अध्यक्ष म्हणून झरी तालुका सचिव कॉ. उरकुडा गेडाम हे होते.
या शिबिराला कॉ. कुमार मोहरमपुरी यांनी पक्षाचे संघटनात्मक स्वरूप सांगून संघटनावाढीचे मार्गदर्शन केले तर ऍड. दिलीप परचाके यांनी पक्षाच्या संघर्षाची माहिती विशद करून आपल्या मागण्या व अधिकार प्राप्त करून घ्यायचे असेल तर न्यायालयीन लढाई सोबत संघर्ष करणे आवश्यकच नाही तर गरजेचे आहे, असे सांगितले.
शिबिराची प्रस्तावना केलापूर तालुक्याचे सचिव कॉ. चंद्रशेखर सिडाम यांनी केले. या शिबिराला झरी तालुक्यातील अनेक गावातील स्त्री पुरुष व युवक सहभागी झाले होते.