•रांगणा भुरकी येथील घटना
अजय कंडेवार,वणी:– शेतात पाणी देण्यासाठी गेलेल्या शेतकऱ्यावर दबा धरून बसलेल्या वाघाने युवकावर हल्ला करून ठार केल्याची घटना रांगणा भुरकी शेत शिवारात अचानक दिनांक 10 नोव्हेंबर 2022 ला सायंकाळीं घडली.
भुरकी रांगणा येथील अभय मोहन देऊळकर, वय 25 वर्ष हा भुरकी शेत शिवारात शेताला पाणी देत असताना अचानक वाघाने हमला चढविला त्यात दोघे जण शेतीला पाणी देत असताना अभयवर वाघाने हल्ला चढविला परंतु, दुसरा इसम त्या ठिकाणाहून मोठमोठे आवाज करीत, पळाला त्यात कुणी घटनास्थळी यायच्या अगोदर वाघाने अभयला ओढत नेऊन त्याला मृत केले.
त्याचे प्रेत सापडले असून गावात दशहतीचे वातावरण पसरले आहे.परिसरात वाघाची दहशत पसरलेली आहे. आता हंगाम सुरू आहे. रोजच वाघाचे हल्ले आपणास दिसुन येत आहेत. परंतु वनविभाग सुस्त असल्याची माहितीही शहरात सूरु आहे.