नागेश रायपूरे, मारेगाव:- शेतकऱ्यांच्या न्याय हक्काकरिता सत्ताधारी सरकारला जागे करण्यासाठी विविध मागण्या घेवून शिवसेनेचे माजी आमदार तथा जिल्हा प्रमुख विश्वास भाऊ नांदेकर यांचे नेतृत्वात शिवसेना, युवासेना,व महिला आघाडी मारेगाव तालुका- शहर च्या वतीने येथील तहसील कार्यालया समोर आज 20 सप्टेंबर रोजी एकदिवसीय धरणे आंदोलन करण्यात येत आहे.
नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या हिताच्या विविध मागण्या घेवुन सत्ताधारी सरकारचे लक्ष वेधण्यासाठी हे धरणे आंदोलन, शिवसेनेच्या वतीने करण्यात येत आहे.यात पुरपिढीतांना तत्काळ सानुग्रह अनुदान मिळण्यात यावा,पीक विमा धारकांना सरसकट पीक विमा मिळावा,पूरग्रस्तांना त्यांच्या शेतीपिकांच्या नुकसानी प्रमाणे त्याचा मोबदला मिळण्यात यावा.तसेच एकोना कोळसा खदानीमुळे नदी पात्र अरुंद होवुन पुराचे पाणी नदी बाहेर थेट शेतात शिरुन शेकऱ्यांचे नुकसान होत आहे.याचे सर्वक्षण करुन यावर उपाय योजना कराव्यात.तसेच दिंदोरा बॅरेज प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन करण्यात यावे.अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना त्वरित मोबदला मिळण्यात यावा.शेतपांदन रस्त्याची त्वरित अंमलबजावणी करण्यात यावी.आदी विविध मागण्या घेवून हे धरणे आंदोलन करण्यात येत आहे.या आंदोलनात परिसरातील तमाम नुकसानग्रस्त शेतकरी बांधवानी सहभागी व्हावे असे आवाहन शिवसेनेचे माजी आमदार तथा जिल्हा प्रमुख विश्वास भाऊ नांदेकर यांनी केले आहे.