• शेतकरी लाभापासून वंचित, मनसेचा पुढाकार
• अन्यथा 17 ला आक्रोश मोर्चा…..
अजय कंडेवार, वणी :- तालुक्यातील अतिवृष्टीचा व महापुराने शेतकऱ्यांना अद्याप अनुदान देण्यात न आल्याने मंगळवारी मनसेचे राज्य उपाध्यक्ष राजू उंबरकर यांचा मार्गदर्शनात तालुका अध्यक्ष फाल्गुन गोहोकार यांचा नेतृत्वात समस्त मनसे सैनिक यांनी वणी SDO यांचा मार्फत निवेदन देत मुख्यमंत्र्यांना साकडे घालण्यात आले आहे.
तालुक्यातील अल्पभुधारक शेतकरी महापूर,अवकाळी पाऊस व अतिवृष्टीमुळे उन्मळून पडला आहे. भारतीय अर्थव्यवस्थेत आर्थिक मंदिचे संकट उभे आहे. ज्याचे मुख्य कारण ग्रामीण भागातील लोकांची आर्थिक परिस्थिती आहे.गेल्या दोन-तीन महीन्यात पडलेला सततच्या दुष्काळाने आणि आता अतिवृष्टीमुळे शेतकरी अधिक त्रस्त झालेला आहे. खर्च भागविण्यासाठी शेतकºयांची प्रचंड तारेवरची कसरत सुरू आहे. त्यामुळे शेतकरी आत्महत्येचे चुकीचे पाऊल उचलतो.
मागील दोन महिन्या अगोदर अतिवृष्टी व महापूरहानी झाल्यामुळे कास्तकार पूर्णपणे आर्थिक व मानसिक दृष्ट्या खचला आहे. परंतु राज्यसरकार व महसूल विभाग याविषयावर अजूनही झोपेचे सोंग घेत असल्याचे दर्शनीय पाहण्यास मिळत आहे. केवळ मदत जाहीर करून शेतकऱ्यांच्या तोडाला पाने पुसणे किंवा शेतकऱ्यांची यहा केल्यासारखे दिसून येत आहे.यवतमाळ जिल्हा हा शेतकरी आत्महत्या करिता जगात कुप्रसिद्ध आहे तरी सुद्धा आपले व सरकारचे हे धोरण शेतकर्याविषयी चांगले नाही म्हणून निवेदनातून कळविण्यात येत आहे की ,येत्या सोमवार म्हणजे दिनांक १७/१०/२०२२ पर्यंत आपण शेतकऱ्यांचा खात्यावर अतिवृष्टी व महापूराचे अनुदान जमा करावे असे झाल्यास शासनाविरोधात आक्रोश मोर्चा तसेच विविध आंदोलन छेडण्यात येईल. यामुळे कायदा व सुव्यवस्था बिघडल्यास आपण स्वतः जबाबदार राहाल याची दक्षता घ्यावी व या अर्जावर आपण काय कार्यवाही कराल ही बाब दिनांक १३/१०/२०२२ रोजी पर्यंत कळवावे.
निवेदन देताना शिवराज पेचे ,पुरुषोत्तम खंडाळकर, विलन बोदाडकर,बंडू बोंडे,सुमित मत्ते,शंकर बोरगलवार ,अमर सोलंकी,अमोल जेऊरकर,संजय लकमापुरे व विशाल दानव व समस्त मनसे सैनिक उपस्थित होते.