•खाडे दांपत्याची “त्या” चिमुकलीला आर्थिक मदतही….
अजय कंडेवार, वणी:- वेगाने होणारा पर्यावरणाचा ऱ्हास आणि महिलांच्या प्रश्नाकडे लक्ष वेधण्यासाठी यवतमाळ जिल्हा ,वणी तालुक्यातील पुनवट या छोट्यास्या गावची प्रणाली विठ्ठल चिकटे ही शेतकऱ्याची कन्या सायकलने 60 दिवसात 4500 किमी पूनवट- वणी ते नागपूर- मध्य प्रदेश-दिल्ली जम्मू-काश्मिर ते लेहलद्दाक हा प्रवास पूर्ण करणार आहे.Farmer’s daughter will cycle 4500 km for 60 days..!
पर्यावरण संवर्धनासाठी नागरिकांमध्ये जागृती निर्माण व्हायला हवी :-
” वाढते इंधन प्रदूषण रोखण्यासाठी नागरिकांनी जवळ फिराला जात असताना सायकलचा वापर करावा. यातून नागरिकांची शरीर तंदुरुस्त राहते यातून पेट्रोलची बचत होऊन इंधन प्रदूषणही रोखण्यात मदत होते. राज्याच्या पर्यावरण संवर्धनासाठी नागरिकांमध्ये जागृती निर्माण करणे गरजेचे असल्याची प्रणालीने यावेळी सांगितले.”
वणीच्या प्रणालीचं सर्वत्र कौतुक :-
“यवतमाळ जिल्ह्यातील वणी तालुक्यातील प्रणाली चिकटे राहते. पर्यावरण संवर्धनासाठी ही 22 वर्षाची प्रणाली महाराष्ट्र भ्रमंतीसाठी सायकलने प्रवास करीत जनजागृती करणार आहे. राज्यातील स्थानिक परिस्थितीचा अभ्यास, पर्यावरणाच्या संवर्धनासाठी जनजागृती, महिला सशक्तीकरणाचा जागर करत प्रणालीने सायकल भ्रमंतीचा निर्धार केला. प्रणाली राज्यभरातील सायकल भ्रमंतीसाठी गेले 60 दिवस 4500 प्रवास करणार आहे.”Farmer’s daughter will cycle 4500 km for 60 days..!
याप्रसंगी टिळक चौक येथे संजय खाडे (अध्यक्ष-रंगनाथ स्वामी अर्बन निधी लिमिटेड, वणी),संगीता संजय खाडे (अध्यक्ष-लक्ष्मी नागरी सहकारी पतसंस्था मर्या,वणी) या दांपत्याने सुख प्रवासाचा शुभेच्छा देत तिला आर्थिक मदतही केली व तिचा सुख प्रवासाकरीता भरघोस शुभेच्छाही देण्यात आले.त्यावेळी राजाभाऊ पाथरडकर,राजू गोरे तसेच परिसरातील चाहतेवर्ग मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.