•आमदार बोदकुरवार व ॲड. विनायक एकरे यांचे नेतृत्वाला पसंती
अजय कंडेवार,वणी :- कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालक मंडळासाठी शुक्रवार दि. 28 एप्रीलला तालुक्यातील 4 बुथवर मतदान पार पडले. त्यात 1 हजार 855 मतदारापैकी 1 हजार 744 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. दोन्ही पॅनलमधील झुंज अखेर संपली व त्यात आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार गटाने बाजी मारत 14 जागेवर एकतर्फी विजय मिळविला. तर महाविकास आघाडीच्या खिश्यात फक्त 4 जागा मिळाल्या.Farmer Ekta Panel’s resounding victory..Amdar Bodkurwar and Adv. Liked the leadership of Vinayak Ekre.
बाजार समितीच्या निवडणुकीत सहकारी संस्था मतदारसंघात 848 मतदारांपैकी 800, तर ग्राम पंचायत मधील 793 पैकी 733 मतदारांनी आपले कर्तव्य बजावले. व्यापारी व अडते गटात 125 पैकी 122 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. तर हमाल तोलारी गटातील 89 मतदारांनी हकक बजावला होता.मतदारांनी मात्र भाजपचे विद्यमान आमदार संजीवरेड्डी बोडकुरवार यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून शेतकरी एकता पॅनलने विजय आणला चुरशीची समजली जाणारी निवडणूक अखेर एकतर्फीच झाली त्यामुळे विरोधकांचा धुव्वाच उडवून दणदणीत मोठा विजय मिळवित वणीच्या कृषी उत्पन्न बाजार समितीवर वर्चस्व निर्माण केले.
विजयी उमेदवार:-
ग्राम पंचायत गटातील विजयी उमेदवार :- शेतकरी एकता पॅनल चे विजय गारघाटे, प्रकाश बोबडे, चंद्रकांत हिकरे, हेमंत गौरकार,व्यापारी अडते व हमाल गटातील विजयी उमेदवार:- शेतकरी परिवर्तन पॅनलचे सतीश बडघरे, रवींद्र कोंगरे ,प्रमोद सोनटक्के .
सहकारी संस्था गटातील विजयी उमेदवार,शेतकरी एकता पॅनलचे अशोक पिदूरकर, वेणूदास काळे,ऍड.विनायक एकरे,मीरा पोतराजे, वैशाली राजूरकर,नितीन पानघाटे, प्रभाकर बोठे, दिलीप बोढाले, मंगल बलकी, मोहन वरारकर व शेतकरी परिवर्तन पॅनलचे प्रमोद वासेकर.