अजय कंडेवार,वणी :- छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त सत्या ग्रुप तर्फे भव्य रक्तदान शिबिर घेण्यात आले. “ग्रुपचे युवकवर्ग एकत्रित येऊन सामाजिक बांधीलकी जोपासत”रक्तदान हेच श्रेष्टदान” म्हणून छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्ताने न .प शाळा क्र.८ रंगारीपुरा, वणी येथे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते .
अनेक इस्पितळात रक्ताचा साथ अपुरा असल्याने मोठ्या संख्येने रक्तदाते दान करण्यास तयार झाले व त्यात युवकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला असून काही शहरातील नागरिकांनी सुद्धा रक्तदान केले. जवळपास ५० रक्त दात्यांनी रक्तदान करण्यात आले . याशिबिराचा अध्यक्ष स्थानी संजय भाऊ देरकर यांनी उपस्थित राहून सत्या ग्रुपला मार्गदर्शन केले.”रक्त दान महत्वाचे आहे तसे प्रत्येकाने सामाजिक दायित्व समजून हे श्रेष्ठ व काळाची गरज म्हणून दान करावे असे मनोगत व्यक्त केले “. या रक्तदान शिबिराला लाईफ लाईन ब्लड बँक यांचे मोलाचे सहकार्य लाभले.
या शिबिराचा यशस्वीतेसाठी सत्या ग्रुपचे सतीश तेवर,फैजल बशीर खान,तुळशी तेवर,निखिल येरणे, विक्की कळसकर, सुरज देठे, स्वप्नील आत्राम,अनिकेत कुरेवार,अस्लम शेख,रौनक तरारे,भूषण सहारे व कृष्णा निमसटकर उपस्थित होते.