• 3 बैलांची सुटका, आरोपी अटकेत.
अजय कंडेवार,वणी :- शिरपूर पोलीस स्टेशनच्या हद्दीत येत असलेल्या शिरपूर देऊळवाळ मार्गे आदिलाबाद येथे अवैधरित्या वाहतूक करुन कत्तलीसाठी जाणाऱ्या गोवंश तस्करीचा पर्दाफाश ता.1 ऑक्टोंबर रविवारी रात्री 9 वाजताचा दरम्यान करण्यात आली असून घटनास्थळावरून पिकअप वाहन किं 4 लाख रू. व 66 हजार रुपये किमतीचे 3 नग गोवंशाची सुटका करून दोन आरोपिंना अटक करीत एकूण 4 लाख 66 हजार रू किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.Cattle smuggling exposed by Shirpur police in the presence police officer API Sanjay Rathod and PSI Rameshvar Kandure.
शिरपूर पोलीस कर्तव्यावर असताना गुप्त बातमीदारांकडून वरोरा येथून देऊळवाळा मार्गावरून काही व्यक्ती जनावरांना निर्दयीपणे दोरीने बांधून गाडीत कोंबून आदिलाबाद येथे जात असल्याची माहिती दि.1 ऑक्टोबर रोजी रात्री 9 वाजता मिळाली. PSI रामेश्र्वर कांडुरे यांनी तात्काळ ठाणेदार P.I संजय राठोड यांना याबाबत कळविले. माहिती मिळताच ठाणेदार व PSI रामेश्र्वर कांडुरे यांनी पोलीस स्टाफ व पंचासह वरोरा ते देऊळवाळा मार्गे जाणाऱ्या रस्त्याजवळ सापळा रचला.
रात्री 9 वाजताचा दरम्यान यामार्गे 2 इसम हे 3 गोवंशीय जनावरांना पिकअप क्र.MH-34- BG -2633वाहनातून एकमेकांना दोरीचा सहाय्याने बांधुन कोंबून गाडीत नेतांना दिसले. पोलिसांनी त्यांना थांबवुन त्यांचे नाव पत्ता विचारले असता त्यांनी ही सदर जनावरे कत्तलीकरिता नेत असल्याची माहिती पोलिसांना दिली.
शिरपूर पोलिसांनी जनावर तस्करांच्या ताब्यातून 3 गोवंश बैलांची सुटका करून चारापाण्याची व्यवस्था नसल्यामुळे गोरक्षण ट्रस्ट येथे पाठविले. तसेच महाराष्ट्र राज्यात गोवंश जनावरांच्या कत्तलीवर प्रतिबंध असताना कत्तलीच्या उद्देशाने जनावरांची वाहतूक करणारे आरोपी हरिदास लटारी गिरसावळे रा.देऊळवाळा, ता. वणी, जि. यवतमाळ व अमोल विठ्ठल काकडे रा. ढाकोरी, ता. वणी असे नाव आहे .यांच्या यांच्या विरुद्ध प्राण्यांचा क्रूरतेने वागवण्यास प्रतिबंध अधिनियम चे कलम 11(1),(D)11(1)(E),11(1)(H) व अधिनियम कलम 5 (À), 5 (B), 9, तसेच म.पो. अधिनियम कलम 119 मोटर वाहन अधिनियम कलम 83/177 मोआका नुसार या आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.Dysp गणेश किंद्रे यांच्या मार्गदर्शनाने सदर कारवाई शिरपूर ठाणेदार PI संजय राठोड यांच्या सूचनेनुसार PSI रामेश्वर कांडुरे व पोलिस कर्मचारी यांनी केली .