अजय कंडेवार, वणी :- अवघ्या 12 तासाचा आत बॅटरी चोरी करणाऱ्या 2 आरोपींना अटक करण्यात आली आहे. शिरपूर पोलिस व स्थानिक गुन्हे शाखेने (दि.18 ऑगस्ट) शुक्रवारी संयुक्तरित्या यशस्वी कारवाई केली. आरोपींकडून मुद्देमाल जप्त करण्यात आले तसेच या प्रकरणातील दोन्ही आरोपींनी गुन्हयांची कबुली दिली व रीतसर शिरपूर पोलिस स्टेशन येथे गुन्ह्याची नोंद करण्यात आली.Shirpur Police and LCB solved the crime of theft in just 12 hours.
सविस्तर वृत्त असे की,पोलीस स्टेशन शिरपूर येथे 379 भा.द.वी कलमाप्रमाणे अज्ञात आरोपी विरुद्ध दि.17 ऑगस्ट रोजी दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याचा तपासाचे चक्र शिरपूर पोलिस व स्थानिक गुन्हे शाखेने फिरविले असता या चोरीचा गुन्ह्यात दोन आरोपी त्यातील संदीप मंगेश भोयर (वय 30 वर्ष ) व हेमंत बबन पायघन (वय 40 वर्ष )दोन्ही रा. पुनवट येथीलच निष्पन्न झाले व त्यांचाकडून चोरीस गेलेल्या ट्रकच्या दोन बॅटऱ्या अंदाजे 14,000/ रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. विशेषतः ही कारवाई संयुक्तरित्या शिरपूर पोलिस व स्थानिक गुन्हे शाखेने यांनी (दि.18 ऑगस्ट)शुक्रवारी यशस्वीरित्या केली.
वरिष्ठांचा आदेशानूसार ही कामगिरी पोलीस स्टेशन शिरपूर ठाणेदार सहाय्यक पोलीस निरीक्षक गजानन करेवाड, API अतुल मोहनकर, सुनील दुबे,योगेश डगवार,सुधीर पांडे,भोजराज करपते,नरेश राऊत, निलेश भुसे व विजय फुलके यांनी केली.