अजय कंडेवार,वणी :- तालुक्यातील शिरपूर पोलिस स्टेशनचा हद्दीत कैलास नगर येथे दि.17 जुन रोजी मिळालेल्या अनोळखी मयत व्यक्तीची अवघ्या काही तासातच शिरपूर पोलीसांनी ओळख पटवून मयताचे पार्थिव शरीर नातेवाईकांचा ताब्यात दिले.Shirpur police identified the unknown Isma in just a few hours.
पोलीस स्टेशन शिरपूर हद्दीत कैलास नगर शिव मंदिर जवळ एक अनोळखी इसम मयत असले बाबत माहिती मिळाल्याने सदर ठिकाणी जाऊन चौकशी केली असता मयत याचे जवळ कोणतेही आधार कार्ड किंवा ओळखपत्र मिळून आले नाही आजूबाजूस चौकशी केली असता, मयत व्यक्तीचे नाव जुगेस बजनाश लाल (वय40) वर्ष रा.उदयपूर,जि- रोहताक (राज्य बिहार) हल्लीचा मुक्काम शिवम इंटरप्राईजेस कोलगाव साखरा असे समजले. त्याचा नातेवाईकांना पोलीसांनी बोलावून मयताचे बॉडीचा घटनास्थळी इन्वेस्ट पंचनामा करून ग्रामीण रुग्णालय वणी येथे शवविश्चेदन केले असता मृतक हा अती मद्य प्राशनाने लिव्हर नाहीसे झाल्यानेच मयत झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले.
सदरची कारवाई ही पोलीस अधीक्षक डॉक्टर पवन बनसोड, अपर पोलीस अधीक्षक पियुष जगताप, उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश किंद्रे यांचे सूचना व मार्गदर्शनात शिरपूर येथील ठाणेदार गजानन करेवाड (सहाय्यक पोलीस निरीक्षक),PSI रामेश्वर कांडुरे व NPC गजानन सवसाकडे यांनी केली आहे.