•रस्ता सुरक्षेबाबत पोलिसांची जनजागृती
अजय कंडेवार ,वणी : तालुक्यातील शिरपूर पोलीस स्टेशनच्या वतीने दिनांक 13 जाने 2023 ला कायर येथे “रस्ता सुरक्षा अभियानानिमित्त ” मोटारसायकल रॅली घेण्यात आले.
वाहतूक नियमांना डावलून आजही अनेक जण हेल्मेट घालणं टाळतात. त्यावरून अनेकांचे पोलिसांशी वाद देखील होतात. पण, ‘डबल टॉप’ टाकून बाईक चालवणार्यांसाठी पोलिसांनी हेल्मेटचे महत्त्व पटवून दिले. त्यासाठी हेल्मेट रॅली देखील काढण्यात आली. या रॅलीद्वारे हेल्मेटचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले. विशेषतः हेल्मेटची गरज काय? याबद्दल माहिती देत जनजागृती करण्यात आली. शासनाने “रस्ता सुरक्षा अभियानानिमित्त” दुचाकी चालकांसाठी हेल्मेट आणि चारचाकी चालकांसाठी सीटबेल्ट बंधनकारक केले आहे. परंतू, वाहन चालकांकडून याबाबी दुर्लक्षित केल्या जातात. आणि शेवटीभयंकर अश्या अपघाताला बळी पडतात.आयोजकांच्या म्हणण्यानुसार, तरूणांमध्ये हेल्मेट वापरण्याचे प्रमाण कमी असल्यामुळे त्यांना हेल्मेटचे महत्त्व समजावे यासाठी ही रस्ता सुरक्षेबाबत पोलिसांची जनजागृती रॅली काढण्यात आली.सदर रॅली मुख्य रस्त्यावरून काढण्यात आली . या रॅलीमध्ये शिरपूरचे ठाणेदार गजानन करेवाडसह समस्त पोलीस अंमलदार व सामान्य नागरिकही सहभागी झाले होते.
“शासनाने दुचाकी चालकांसाठी हेल्मेट आणि चारचाकी चालकांसाठी सीटबेल्ट बंधनकारक केले आहे. पण, वाहन चालकांकडून याबाबी दुर्लक्षित केल्या जातात. तसेच तरूणांमध्ये हेल्मेट वापरण्याचे प्रमाण कमी व गाडी चालवीत असताना मोबाईलवर बोलण्याचे प्रमाण वाढत असल्यामुळे त्यांना हेल्मेटचे महत्त्व समजावे यासाठी ही रॅली काढण्यात आली.रस्ता सुरक्षा यासाठी की, जीवघेण्या अपघातांचे प्रमाण जास्त प्रमाणावर वाढ होत आहे. मात्र, फक्त हेल्मेट न वापरल्याने दुचाकीस्वारांचा मृत्यू होत आहे. दुर्दैवाने हा आकडा मोठा आहे. किमान आपल्या कुटुंबीयांच्या आनंदासाठी आणि स्वत:च्या जीवासाठी प्रत्येकाने हेल्मेटचा नक्कीच वापर करावा” – गजानन करेवाड (ठाणेदार, पो. स्टे. शिरपूर)