•29 ग्रामपंचायतीचे समर्थन.
अजय कंडेवार,वणी :– शिरपूर तालुका झाला पाहिजे, या मागणीसाठी 2012 रोजी शिरपूर गावाला तहसीलचा दर्जा मिळणार होता.11 वर्ष लोटूनही तालुक्याचा दर्जा मिळाला नाही, त्यामुळें शिरपूर हा तालुका झालाच पाहिजे म्हणून साखळी उपोषण करणार असून उपविभागीय अधिकारी मार्फत महाराष्ट्र राज्य मुख्यमंत्री यांना दि.1 डिसेंबर रोजी देण्यात आलेल्या निवेदनाद्वारे साकडे घालण्यात आले.
पुनवट,शिरपूर,कायर व शिंदोला या चारही महसूल मंडळाच्या केंद्रस्थानी असून जनतेकरीता शासकीय सोयी-सुविधा व कामकाजाच्या दृष्टीने सध्याचे वणी मुख्यालय अनेक कारणांनी गैरसोयीचे ठरत असून सामान्य जनजीवनावर त्याचा दुष्परिणाम दिसून येत आहे. विशेषता,इंग्रजांच्या राजवटीत 1864 साली वणी जिल्ह्याची निर्मिती केलेली होती.
वणी तहसीलला मोठ्या प्रमाणात गावे जोडली असल्यामुळे वणी तालुक्याच्या शेवटच्या टोकाकडील जनतेला प्रशाकीय कामे करण्यास अडचण निर्माण होत आहे व त्यांना वणी या ठिकाणी येण्यासाठी मोठ्या प्रमाणात अंतर असल्यामुळे वेळही वाया जातो व आर्थिक भुर्दंड सोसावा लागत आहे. तसेच लोकसंखेचा विचार करता, वणी तहसील ला जास्त गावे तर जोडली आहे. परंतु वणी शहराची लोकसंख्या मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. त्यामुळे प्रशासकीय कामे लवकर होत नाही. त्यामुळे २९ ग्रामपंचायतीने शिरपूर गावाला तहसीलचा दर्जा देण्याकरिता समर्थन दिले आहे. शिरपूर ग्रामवासीयांनी सुद्धा भरपूर वेळा शासनाला निवेदन सादर केले आहे. तरी देखील शासनाने कोणत्याही प्रकारची कार्यवाही केलेली नाही.
त्यामुळे शिरपूर परिसरातील ग्रामवासी तसेच शिरपूर येथील ग्रामवासी ,रमेश बरडे, गणेश डाहुले, प्रमोद मंदे, जगदीश मारोती बोरपे, शेख रशीद शेख गुलाब, पवन सुरेश घोंगे, सतीश बोंडे, चंद्रशेखर पाचभाई, मिलिंद पाचभाई, पूजा वैद्य, शालू केळकर, मनीषा ननकटे, जया नागरकर हे सर्व दि.9 डिसें रोजी पासून मागणी पूर्ण होत नाही तोपर्यंत शिरपूर येथे साखळी उपोषणाचा इशारा देण्यात आला.