अजय कंडेवार,Wani:- पोलीस स्टेशन शिरपुर येथे विविध गुन्हयांत जप्त असलेल्या तसेच सदर गुन्हयांचा अंतीम निकाल लागलेल्या व मालकी हक्क न दाखवलेले गुन्हयातील 2 चारचाकी व 31 दुचाकी वाहनांचा जाहीर लिलाव प्रादेशीक परिवहन अधिकारी यवतमाळ यांचे मार्फतीने व उपस्थितीने 25 ऑगस्ट रोजी सकाळी 10.00 वाजता करण्यात येणार आहे.
गंभीर प्रकरणात सदर वाहनांवर खटला दाखल करून ती जप्त केली जातात. या वाहनांवरील कार्यवाही पूर्ण करून वाहनधारकांनी संबंधित वाहन सोडून घेणे अपेक्षित असते. मात्र, जप्त केलेली अनेक वाहने वर्षानुवर्षे सोडवली जात नाहीत. बेवारस वाहनांचा आता लिलाव केला जाणार आहे. असेच बेवारस वाहणे शिरपूर ठाण्यात दुचाकी,चारचाकीचा समावेश आहे.वाहन मालकांचा मुळ मालकांच्या शोध घेऊनही नसापडत असल्याने ही प्रक्रिया केली जाणार आहे.अपघात, चोरी तसेच फसवणुकीसह इतर काही प्रकरणात पोलिसांनी कारवाई केल्यानंतर अनेकदा संबंधित वाहने जप्त केली जातात. तर दंडात्मक कारवाई करून अशी वाहने सोडून दिली जातात. मात्र, गंभीर प्रकरणात सदर वाहनांवर खटला दाखल करून ती जप्त केली जातात. या वाहनांवरील कार्यवाही पूर्ण करून वाहनधारकांनी संबंधित वाहन सोडून घेणे अपेक्षित असते. मात्र, जप्त केलेली अनेक वाहने वर्षानुवर्षे सोडवली जात नाहीत.त्यावरील कर, दंड भरला जात नाही.त्यामुळे ती वाहने पोलीस ठाण्याच्या आवारात वर्षानुवर्षे पडून असतात. शिरपूर पोलीस ठाण्यांच्या आवारात अशी 2 चारचाकी व 31 दुचाकी आहेत. अनेक वाहने वर्षानुवर्षे एकाच जागेवर असल्याने कुजली आहेत. यामुळे पोलीस स्टेशन आवारात जागा कमी पडत आहे. त्यामुळे वणी न्यायदंडाधीकारी यांनी अंतीम निकाल दिल्याने शिरपूर पोलिसांकडून या वाहनांचा लिलाव केला जाणार आहे.
“संबंधित वाहने अनेक वर्षांपासून पोलीस ठाणे आवारात पडलेली आहेत. त्यांच्या मालकांचा शोध घेण्यात आलेला आहे. मात्र, ते मिळून आलेले नाहीत. त्यानुसार सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून वाहने लिलावाने विकण्यात येणार आहेत.” – शिरपूर पोलिस स्टेशन,ठाणेदार API माधव शिंदे