अजय कंडेवार, वणी:- शिरपूर पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या येनक शिवारात येथे लपून छपून सुरू असलेल्या कोंबड बाजारावर शिरपूर पोलिसांनी काल सायंकाळी 4.30 वाजता जबरदस्त धाड टाकून आठ आरोपीवर कार्यवाही करून 2 लक्ष 15 हजार 720 रु असा एकुण मुद्देमाल जप्त करण्यात आहे.
सविस्तर वृत्त असे की, काल 22 जाने रोजी येनक शिवारातील जंगलात कोंबडयाची झुंज लावुन त्यावर पैसे लावून काही व्यक्ती हारजीतीचा जुगार खेळत आहेत अशी गोपनीय माहिती एपीआय गजानन करेवाड ठाणेदार शिरपुर, पोलीस उपनिरीक्षक रामेश्वर कांडुरे पोलीस स्टॉफसह वेशांतर करुन येनक येथे एका खाजगी वाहनाने धाड मारली असता . त्याठिकाणी ठीकाणी 8 व्यक्ती कोंबडयांचे झुंझीवर पैसे लावुन हारजीतचा जुगार खेळत होते. तेव्हा त्याना जागीच ताब्यात घेतले व खाकी दाखविताच असता त्यांनी नावे सांगण्यास सुरूवात केली. पोलिसांनी ताब्यात घेतलेल्याची नावे १) बंडु लक्ष्मन वाघाडे वय ४८ वर्ष रा. कुरई ता. वणी जिल्हा यवतमाळ २) सचीन नागोबा बोराडे वय ३२ वर्ष रा. गोवारी ता. वणी जिल्हा यवतमाळ ३) महेश संग्राम सरोज वय ४९ वर्ष रा. अमराई वार्ड घुगुस ता. जिल्हा चंद्रपुर ४) गणेश दीलीप बांदुरकर वय ३५ वर्ष रा. शेणगावता. जिल्हा चंद्रपुर ५ ) शंकर नामदेव बरडे वय ३२ वर्ष रा. शेणगाव ता. जिल्हा चंद्रपुर ६) आकाश यादव चंदरे वय २१ वर्ष रा. शेणगाव ता. जिल्हा चंद्रपुर ७) संकेत रवोद्र खारकर वय २० वर्ष रा. शेणगाव ता. जिल्हा चंद्रपुर ८) अजय भैयाजी आकुलवार वय ३८ वर्ष रा. सावंगी ता. वणी जि.यवतमाळ तसेच घटनास्थळावरून जिवंत कोबडे व मयत कोबडे तसेच मोटार सायकली व आरोपीचे अंगझडतीत रोख रक्कम असा एकून २ लक्ष १५ हजार ७२० /- रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करुन आरोपीवर शिरपुर पोलिसांनी महाराष्ट्र जुगार कायदा कलम १२ (ब) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सदरची कार्यवाही जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. पवन बन्सोड साहेब, अपर पोलीस अधीक्षक पियुष जगताप साहेब, उपविभागीय पोलीस अधिकारी संजय पुज्जलवार यांच्या मार्गदर्शनात एपीआय गजानन करेवाड, ठाणेदार पोलीस स्टेशन शिरपुर, पोलीस उपनिरीक्षक रामेश्वर कांडुरे, सुनील दुबे ,गजानन सावसाकळे, पाटील,विजय फुलके यांनी केली आहे.

