•आदर्श सरपंच भास्करराव पेरे पाटील यांचे सुंदर गाव, व्यसनमुक्त गाव या विषयावर मार्गदर्शन.
अजय कंडेवार,वणी:- मागील चार वर्षांपासून गुरुदेव सेवा मंडळ व माऊली परिवार शिंदोला यांच्या वतीने श्रीमद भागवत कथा, ज्ञानयज्ञ व व्यसनमुक्ती सप्ताहाचे आयोजन ता.9 डिसें.ते 15 डिसे पर्यंत बोबडे ले-ऑउट, शिंदोला ता. वणी, जि. यवतमाळ येथे करण्यात आले.
महाराष्ट्र शासन पुरस्कृत व्यसनमुक्ती प्रचारक प्रसिद्ध व्यसनमुक्ती सम्राट भागवताचार्य ह.भ.प.रामेश्वर महाराज खोडे (ईसापुर) यांच्या वाणीतून भाविकांना भागवत कथा, भजन, कीर्तन, प्रवचन, मार्गदर्शन मिळणार आहे.या भागवत सप्ताहात सकाळी 6 वाजता ध्यानपाठ, 6.30 वाजता सामुदायिक प्रार्थना व 7 वाजता ग्रामसफाई करण्यात येणार आहे. 11 डिसे. रोजी दुपारी 12 वाजता पाटोदा ग्रामपंचायतचे माजी सरपंच भास्करराव पेरे यांचे समस्त उपस्थित ग्रामपंचायत सरपंच यांना सुंदर गाव, व्यसनमुक्त गाव या विषयावर मार्गदर्शन करणार आहे म्हणून तालुक्यातील सर्व सरपंच, उपसरपंच, ग्रा.पं.सदस्य व भाविकांनी कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन गुरुदेव सेवा मंडळ व शिंदोला माऊली परिवार च्या वतीने करण्यात आले आहे.दि. 16 डिसे. रोजी सकाळी 8 वाजता ग्रंथ दिंडी व दुपारी 12.30 वाजता कीर्तन व दुपारी 3 वाजता महाप्रसाद वाटपही करण्यात येणार आहे.
गेल्या 2 वर्षात कोरोनामुळे खंड पडल्याने कार्यक्रम होऊ शकले नाही परंतू या अगोदर अतिशय आनंदात आणि उत्साहात कार्यक्रम पार पडला होता.कथेचे हे चौथे वर्ष आहे.त्यामुळे यंदा सुद्धा मोठ्या आनंदात आणि उत्साहात कार्यक्रम पार पडेल अशी आशा गुरुदेव सेवा मंडळ व माऊली परिवार शिंदोला मंडळाने व्यक्त केली.