•लायन्स क्लब वणी व वणी लायन्स चॅरिटेबल ट्रस्टच्या संयुक्त विदयमाने स्तुत्यमय उपक्रम.
विदर्भ न्युज डेस्क, वणी:- लायन्स इंटरनॅशनल सेवा सप्ताहा अंतर्गत लायन्स क्लब वणी व वणी लायन्स चॅरिटेबल ट्रस्ट च्या संयुक्त विदयमाने, लायन्स स्कूल येथे शालेय विद्यार्थांसाठी 3 दिवसीय शिबिराचे यशस्वी आयोजन दि. ३ ते ५ आक्टो. २०२३ दरम्यान करण्यात आले. लायन्स शाळेचे सुमारे 2 हजारचा जवळपास विद्यार्थ्यानी दंत तपासणी करून योग्य मार्गदर्शन करण्यात आले.
दंत तपासणी व निदान शिबिराचे उदघाटन वणी लायन्स चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष व आ.संजीवरेड्डी बोदकुरवार यांचे हस्ते, वणी लायन्स ट्रस्ट चे माजी अध्यक्ष शमीम अहमद, लायन्स क्लबचे अध्यक्ष लायन राजाभाऊ उर्फ हरिहर पाथ्रडकर, यांचे अध्यक्षतेखाली तसेच वर्णी लॉयन्स ट्रस्ट चे उपाध्यक्ष बलदेव खंगर, लायन्स क्लबचे सचिव किशन चौधरी प्रमोद देशमुख,चंद्रकात जोबनपुत्रा ,रमेश बोहरा व महेंद्र श्रीवास्तव यांचे प्रमुख उपस्थितीत करण्यात आले.
या तीन दिवशीय दंत चिकीत्सा व निदान शिबिराला शहरातील जेष्ठ दततज्ञ डॉ.विजय राठोड यांचे मार्गदर्शनाखाली डॉ. मकरंद सपाट,डॉ.ललीत लांजेवार, डॉ.मोनालिशा चौधरी, डॉ.निशीगंधा वाढरे, डॉ.रेशम शुगवानी व चंद्रपुरचे डॉ. सात्वीक गुंडावार यांनी आपली सेवा दिली व विदयार्थ्यांची तपासनी करून त्यांना मार्गदर्शन केले.दि.5.आक्टोबर 2023 रोजी लायन्स क्लब वणी व वणी लायन्स चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने समारोपीय कार्यक्रम घेण्यात आला. या वेळी लायन्स क्लबचे संस्थापक सदस्य प्रमोद देशमूख अध्यक्षस्थानी होते तर लायन्स ट्रस्टचे कोषाध्यक्ष चंद्रकांत जोबनपुत्रा, ट्रस्टचे माजी सचिव महेंद्र श्रीवास्तव लायन्स क्लबचे अध्यक्ष राजाभाऊ उर्फ हरिहर पाथ्रडकर, सचिव किशन चौधरी पुरूषोत्तम खोब्रागडे उपस्थीत होते यावेळी डॉ. विजय राठोड व सहकारी डॉक्टर चमूचे स्वागत करून त्यांना कृतज्ञतापूर्वक सन्मानचिन्ह पाहुण्यांचे हस्ते देण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्तावीक लायन्स क्लबचे अध्यक्ष राजाभाऊ उर्फ हरिहर पाथ्रडकर यांनी केले तर प्राचार्य प्रशांत गोडे यांनी अतीथी दंतवैदयाचे आभार मानले, संचालन पल्लवी जेनेकार व सिमा पांडे यांनी केले.
दंत शिबिराला तथा यशस्वीते करिता वणी लायन्स वरिष्ठ महाविदयालयाच्या प्राचार्य दिपासिंह, परिहार शाळा पर्यवेक्षीका संध्या बेदडेवार, मनिषा कापसे, तसेच शिक्षक व कर्मचारी यांनी सहकार्य केले.